भाजप नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, क्रौर्याची परिसीमा गाठली, झाडाला लटकवलं
अल्पवयीन मुली, महिलांवरचे अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. उलट अत्याचाराची परिसीमा गाठली जात असल्याचं दिसतं आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये जे घडलं आहे ते ऐकूण, वाचून तळपायाची आग मस्तकाला जाईल (Minor Girl Of BJP Leader Tortured Raped And Murdered In Ranchi Jharkhand).
रांची : काही घटना संतापजनक ह्या शब्दांच्या पलिकडच्या आहेत. कायदे कितीही कठोर केले, कितीही शिक्षा सुनावली तरी अल्पवयीन मुली, महिलांवरचे अत्याचार कमी होताना दिसत नाहीत. उलट अत्याचाराची परिसीमा गाठली जात असल्याचं दिसतं आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये जे घडलं आहे ते ऐकूण, वाचून तळपायाची आग मस्तकाला जाईल (Minor Girl Of BJP Leader Tortured Raped And Murdered In Ranchi Jharkhand).
नेमकं काय घडलं रांचीत?
झारखंडमध्ये एक जिल्हा आहे. त्याचं नाव पलामू. इथेच भाजपच्या एका स्थानिक नेत्याच्या अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करुन, तिचे डोळे काढले, नंतर तिनं आत्महत्या केल्याचं भासवण्यासाठी तिचा मृतदेह चक्क झाडाला टांगला. पोलीसांनी प्रदीपकुमारसिंह नावाच्या एका आरोपीला अटक केली आहे. इतर आरोपींचा अजूनही शोध सुरु आहे. मुलीचं वय 16 वर्ष होतं.
आणि मुलगी गायब झाली
ही घटना आहे 7 जूनची. म्हणजेच तीन दिवसांपुर्वीची. पीडीत मुलगी सकाळी 10 वाजता घराबाहेर पडली ती परत आलीच नाही. मुलगी परतली नाही म्हणून आई वडीलांनी तिची शोधा शोध केली पण काहीच पत्ता लागला नाही. काही माहितीही मिळत नव्हती. शेवटी भाजपचे स्थानिक नेता असलेल्या वडीलांनी पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी मुलीचा शोध सुरु केला.
मुलगी बेपत्ता झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे 9 जून रोजी लालीमाटीच्या जंगलात एका मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. कुटुंबियांनी ओळख पटवल्यानंतर ही त्यांचीच मुलगी असल्याची खात्री पटली. घटनास्थळावरुन एक मोबाईल पोलीसांच्या हाती लागला, त्यावरुन एकाला अटक करण्यात आली आहे. पीडीत मुलीचे डोळे काढले गेल्याचं तिच्या वडीलांनीच सांगितलं आहे. त्यांना चार मुली आणि एक मुलगा आहे. जिच्यावर बलात्कार झाला ती सर्वात मोठी मुलगी होती.
इन्स्टाग्रामवर मैत्री, वाढदिवसाच्या पार्टीसाठी बोलावलं, अल्पवयीन मुलीवर एकाच रात्री तीन ठिकाणी सामूहिक बलात्कारhttps://t.co/FWubgXdX7J#MinorGirlRape #Rape #MinorGirl #GangRape #Crime #MumbaiCrime #Crime
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 5, 2021
Minor Girl Of BJP Leader Tortured Raped And Murdered In Ranchi Jharkhand
संबंधित बातम्या :
वाढदिवसाच्या दिवशी विश्वासघात ! जंगलात नेऊन बलात्कार, प्रियकराने असं का केलं? तरुणीला हुंदका
मालेगावात अल्पवयीन मुलाचे अपहरण करुन हत्या, घटनेच्या दोन आठवड्यानंतर आरोपीचा कबुलीनामा!
पतीसाठी दरवाजा उघडा ठेवला, शेजारचा नराधम गुपचूप घरात शिरला, महिलेला मारहाण करत बलात्कार