जेव्हा पोलीसच दुष्कृत्याची परिसीमा गाठतात, अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य, लांच्छनास्पद घटना

कायद्याचं रक्षण करणारे काही पोलीसच जेव्हा लांच्छनास्पद कृत्य करतात तेव्हा सर्वसामान्य माणसांनी आपली तक्रार घेऊन नेमकी कुणाकडे जावं? हा प्रश्न निर्माण होतो.

जेव्हा पोलीसच दुष्कृत्याची परिसीमा गाठतात, अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य, लांच्छनास्पद घटना
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 10, 2021 | 2:59 PM

मुंबई : महिला अत्याचाराबद्दल अनेक भाषणं केली जातात. मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. कायदे कडक केले जातात. पण तरीही या घटना कमी होताना दिसत नाहीत. विशेष म्हणजे कायद्याचं रक्षण करणारे काही पोलीसच जेव्हा लांच्छनास्पद कृत्य करतात तेव्हा सर्वसामान्य माणसांनी आपली तक्रार घेऊन नेमकी कुणाकडे जावं? हा प्रश्न निर्माण होतो. खाकी वर्दितल्या अशा भक्षकांना फ्रेंच राज्यक्रांतीच्या चळवळीत जसा सोळाव्या लुईचा शिरच्छेद करण्यात आला होता तसा शिरच्छेद कारावा, असं वाटलं तर त्यात काहीच वावगं नाही. सोळाव्या लुईच्या जुलमी राजवटीने मानवतेचे लचके तोडले होते. आणि आज या लोकशाहीप्रधान देशात खाकी वर्दितले काही नराधम जेव्हा अल्पवयीन मुलीच्या चारित्र्याचे लचके तोडतात तेव्हा त्याचाही अशाचप्रकारे शिरच्छेद करण्यात यायला हवा.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही उत्तर प्रदेशच्या कानपूर शहरातली आहे. आरोपीचं दिनेश त्रिपाठी असं नाव आहे. तो माजी पोलीस निरीक्षक आहे. याचा अर्थ तो जबाबदार कायद्याचा रक्षकच असणं, अपेक्षित आहे. पण त्याने केलेलं कृत्य हे तळपायतली आग मस्तकात नेणारं आहे. त्याच्या दुष्कृत्याची शिक्षा त्याला मिळेलच. दरम्यान, पोलिसांनी सध्या या दिनेश त्रिपाठीला बेड्या ठोकल्या आहेत. लवकरच त्याचं मेडिकल केलं जाणार आहे. खरं-खोटं लवकरच समोर येईल. पण पोलीसवालेच असं कसं वागू शकतात? असा सवाल शहरात उपस्थित केला जातोय.

काही वर्षांपूर्वी दिनेश त्रिपाठी हा कानपूरच्या चकेरी पोलीस ठाण्यात इंचार्ज पदावर कार्यरत होता. त्यावेळी त्याने चकेरी येथील फ्रेंड्स कॉलनीत घर घेतलं होतं. याच घरात पीडित अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होती. आरोपी दिनेश त्रिपाठी हा रविवारी (8 ऑगस्ट) रात्री घरी आला. त्यावेळी पीडिता ही घरात एकटीच असल्याचं त्याने पाहिलं. घरात पीडितेशिवाय कुणीही नसल्याची खातरजमा त्याने केली. त्यानंतर त्याने पीडितेवर जबदरस्ती करत बलात्कार केला.

आरोपीला अटक

या घटनेनंतर पीडितेचे कुटुंबिय घरी आले तेव्हा त्यांची पायाखालची जमीनच घसरली. त्यांनी तातडीने आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर आरोपी दिनेश त्रिपाठी याच्या मुसक्या आवळल्या. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याला आज कोर्टात हजर केलं जाणार असून त्याचं मेडिकल देखील करण्यात येणार आहे.

कानपूरमध्ये याआधीदेखील अशीच घटना

विशेष म्हणजे कानपूर शहरात पोलीसाकडून होणाऱ्या अत्याचाराची ही पहिलीच घटना नाही. याआधी देखील चकेरीच्या अमरजीत शाही नावाच्या पोलिसाने एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकावत तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचं उघड झालं आहे.

हेही वाचा :

विद्यार्थिनीवर अत्याचार करताना रंगेहाथ पकडलं, यवतमाळमधील ‘आदर्श शिक्षका’चे निलंबन

पुण्यात बनावट ग्राहक पाठवून लॉजवर छापा, देह व्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश, तिघींची सुटका

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.