‘पप्पांनी एका माणसाला मारुन जमिनीत पुरलं’, 13 वर्षीय मुलीची पोलीस ठाण्यात तक्रार

मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्याचा मृतदेह थेट जमिनीत पुरला.

'पप्पांनी एका माणसाला मारुन जमिनीत पुरलं', 13 वर्षीय मुलीची पोलीस ठाण्यात तक्रार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Oct 27, 2021 | 9:25 PM

भोपाळ : मध्यप्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एका नराधमाने क्षुल्लक कारणावरुन एका तरुणाची हत्या केली आहे. विशेष म्हणजे आरोपी तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने त्याचा मृतदेह थेट जमिनीत पुरला. हा सर्व प्रकार आरोपीच्या 13 वर्षीय मुलीच्या समोर घडला. या सगळ्या प्रकरणावर भेदरलेल्या मुलीने थेट पोलीस ठाणे गाठत या विरोधात तक्रार केली. मुलीच्या तक्रारीमुळे संबंधित प्रकार उघड झाला.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव कन्हैया बारसिया असं आहे. तर त्याने हत्या केलेल्या व्यक्तीचं नाव अजेश वर्मा असं आहे. आरोपी कन्हैया बारसिया याची मृतक अजेश शर्मा वर्मासोबत सोमावारी (25 ऑक्टोबर) ओळख झाली होती. अजेश हा अमरवाडा पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या धुई गावाचा रहिवासी आहे. तो सोमवारी आपल्या बाईकने घरी जात होता. या दरम्यान कन्हैयाने रस्त्यावर त्याच्याकडून लिफ्ट मागितली. अजेशने त्याला लिफ्ट दिली.

कन्हैयाकडून अजेशची हत्या

गाडीवर एकत्र जात असताना दोघांमध्ये बोलणंचालणं झालं. त्यांचे विचार जुळले. ते एकेठिकाणी थांबले. तिथे ते दारु प्यायले. त्यानंतर अजेशने कन्हैयाला आपल्याला भूक लागली असल्याचं सांगितलं. त्यानंतर कन्हैया त्याला पिपरिया येथील आपल्या गावी घरी घेऊन गेला. घरी गेल्यावर दोघांमध्ये एका क्षुल्लक कारणावरुव वाद झाला. कन्हैया अजेशला जंगलाच्या दिशेला घेऊन गेला. तिथे त्याने अजेशची निर्घृणपणे हत्या केली. त्यानंतर त्याने घरापासून काही अंतरावर असलेल्या जंगलात गाडलं.

आरोपीच्या मुलीची पोलिसात तक्रार

विशेष म्हणजे हा सर्व प्रकार आरोपीच्या 13 वर्षीय मुलीने आपल्या डोळ्यांदेखत पाहिला. त्यामुळे ती घाबरली होती. तरीही तिने पोलिसात या सगळ्या घटनेची माहिती देण्याचं ठरवलं. त्यानुसार ती सिगोडी पोलीस ठाण्यात गेली. तिथे त्यांनी पोलिसांकडे आपल्या वडिलांची तक्रार केली. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत मुलीला घेऊन ते पिपरीया गावात गेले. तिथे पोलिसांनी मुलीच्या वडिलांना जाब विचारला.

पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या

आरोपी कन्हैय्या पोलिसांना उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. आपण कुणाचीदेखील हत्या केली नाही. तसेच आपल्याला काहीच ठाऊक नाही, असं नाटक करु लागला. पण पोलिसांसमोर त्याच्या मुलीने हत्येबद्दल सांगितलं तेव्हा त्याने मान खाली घातली. त्यानंतर तो रडत-रडत बोलू लागला. त्याने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी आरोपीला लगेच ताब्यात घेतलं. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

बँकेतून काढलेले दोन लाख रुपये दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पळवले; नाशिकमधली भर दुपारची घटना

VIDEO : कल्याण पाठोपाठ आता भिवंडीत महिला चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्स मालकाची नजर चुकवत बांगड्या लांबविल्या

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.