भयंकर… धक्कादायक… मेक्सिकोन महिलेवर मुंबईसह चार शहरात बलात्कार; इन्स्टाग्रामवरील ओळखीचा गैरफायदा
माणुसकीला काळीमा फासणारी... इन्स्टाग्रामवरील ओळख मेक्सिकोन महिलेला पडली महागात... महिलेवर एक दोन नाही तर, चार ठिकाणी बलात्कार, महिलेने पोलिसांत आरोपीविरोधात तक्रार दाखल... धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ...
मुंबई | 3 मुंबई 2023 : सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवीन ओळखी होतात. संपर्क वाढतो… पण हेच वाढलेले संपर्क आणि अनोळख्या भेटी महागात पडू शकतात. आता देखील असंच काही झालं आहे. मुंबईत मेक्सिकोन महिलेवर बलात्कार आणि अनैसर्गिक संबंधांसाठी बळजबरी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. मेक्सिकोन महिलेने स्वतःवर झालेल्या अन्यायानंतर पोलिसांत धाव घेतली आणि आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे. महिलेने तक्रार दाखल करताना पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका मेक्सिकोन महिलेने मुंबईतील एका कार्यक्रमाच्या आयोजकावर बलात्कार आणि लैंगिक छळाचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. मेक्सिकोन महिला आणि मुंबईतील आयोजकाची ओळख 2017 मध्ये इंस्टाग्रामवर झाली होती. भेटीचं रुपांतर कालांतराने प्रेमात झालं आणि दोघांनी एकमेकांना डेट करण्यात सुरुवात केली.
महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने तिच्यावर 2019 मध्ये त्याच्या राहत्या घरी बलात्कार केला. एवढंच नाही तर, कामानिमित्त प्रवासा दरम्यान देखील आरोपीने महिलेवर अनैसर्गिक संबंधांसाठी बळजबरी केली असल्याची माहिती समोर येत आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नकार दिल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील आरोपीने महिलेला दिल्याची माहिती समोर येत आहे.
आरोपीने महिलेवर एक शहरात नाही तर, तब्बल चार शहरांमध्ये बळजबरी केली. चंदीगड, कोलकाता आणि बेल्जियममधील हॉटेलमध्ये त्याने आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोपही महिलेने केला आहे. पीडित महिलेने नुकतीच वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पीडित महिलेने दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांकडून आरोपीवर बलात्कार, अनैसर्गिक लैंगिक संबंध, लैंगिक छळ आणि पाठलाग या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सध्या सर्वत्र खळबळ माजली आहे. यापूर्वी देखील यांसारख्या अनेक घटना घडल्या आहेत. ज्यामुळे महिलांना अनेक वाईट संकटांचा सामना करावा लागला आहे.
नवी मुंबई याठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचार
अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार, गर्भधारणा करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी 23 वर्षीय तरुणाला अटक केल्याची घटना देखील काही दिवसांपूर्वी समोर आली होती. मिळालेल्या माहितीनुसार आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.