मिस केरळ विजेत्या-उपविजेत्या सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात, दोघींचा जागीच मृत्यू

केरळ जिल्ह्यातील चक्करापरंबू येथील हॉलिडे इनजवळ एका दुचाकीला धडक दिल्यानंतर अॅन्सी आणि अंजना प्रवास करत असलेल्या कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिस केरळ विजेत्या-उपविजेत्या सौंदर्यवतींचा भीषण कार अपघात, दोघींचा जागीच मृत्यू
(डावीकडे) अॅन्सी कबीर आणि अंजना शाजन
Follow us
| Updated on: Nov 01, 2021 | 2:06 PM

तिरुअनंतपुरम : ‘मिस केरळ 2019’ या सौंदर्य स्पर्धेची विजेती अॅन्सी कबीर (Ancy Kabeer) आणि उपविजेती अंजना शाजन यांचा (Anjana Shajan) यांचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री व्हिटिला-पलारीवट्टम महामार्गाच्या बायपासवर झालेल्या कार अपघातात दोघींनाही जागीच प्राण गमवावे लागले. या घटनेमुळे सौंदर्यवतींच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून चाहतेही शोकाकुल अवस्थेत आहेत. अपघातात झालेल्या कारच्या चुराड्याची भीषण दृश्यं समोर आली आहेत.

कसा झाला अपघात

केरळ जिल्ह्यातील चक्करापरंबू येथील हॉलिडे इनजवळ एका दुचाकीला धडक दिल्यानंतर अॅन्सी आणि अंजना प्रवास करत असलेल्या कारचे नियंत्रण सुटले. त्यानंतर कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळून पलटी झाली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघांची प्रकृती गंभीर

पलारीवट्टोम येथील ईएमसी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कारमधील अन्य एकाची प्रकृती चिंताजनक आहे, तर दुसऱ्याची प्रकृती स्थिर आहे. पालरीवट्टम पोलिसांनी सांगितले की, ज्या दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात कारला अपघात झाला, तो जखमी अवस्थेत घटनास्थळावरुन पळून गेला.

मॉडेलिंग फोटो शूट

दोन्ही सौंदर्यवतींचे मृतदेह त्याच रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. 24 वर्षीय अॅन्सी कबीर थिरुवनंतपुरम, तर 25 वर्षीय अंजना शाजन ही त्रिशूर येथील रहिवासी होती. दोघी आपल्या मूळ गावांमधून मॉडेलिंग फोटो शूटसाठी कोची येथे आल्या होत्या. 2019 या वर्षी ‘मिस केरळ’ या सौंदर्य स्पर्धेत अॅन्सी कबीर विजेती, तर अंजना शाजन उपविजेती ठरली होती.

थ्रिसूरला जात असताना चक्करापरंबू जंक्शन या अपघात प्रवण भागात बाईकस्वाराला वाचवण्याच्या त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. धडकेनंतर कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातातील एक प्रवासी गंभीर जखमी असून अन्य एकाची प्रकृती स्थिर आहे.

अंजना शाजनचे इन्स्टाग्राम फोटो

संबंधित बातम्या :

मुंबईत दहाव्या मजल्यावरुन लिफ्ट कोसळली, तीन वर्षांच्या बालकासह पाच जण जखमी

VIDEO : उल्हासनगरात 10 ते 15 गाड्यांची तोडफोड, घटनेने परिसरात खळबळ

घरासमोर जाऊन चौघांनी वाद घातला, 33 वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.