सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू
सतीश उके यांनी फक्त विनयभंगच नाही, केला तर इतरही अनेक गंभीर आरोप उके यांच्यावर फिर्यादीकडून करण्यात आले आहेत.
नागपूर : वकील सतीश उके (Satish Uke) आणि प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2007 ते 2020 या काळातील हे प्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांविरोधत फिर्यादिने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची प्राथमिक महिती समोर आली आहे. अजनी पोलिसांनी (Nagpur Police) गुन्हा दाखल केल्याने लवकरच कारवाईची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यात उके यांच्यावर फक्त वियभंगच (Violation) नाही, इतरही काही गंभीर आरोप आहेत. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं, अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तीवाद केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रकरणातही उके हे फडणवीसांविरोधात बाजू मांडत होते. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. आता उके यांच्या अडचणी वाढताना दिसताहेत. बनावट कागदपत्र बनवल्याप्रकरणी उके यांना याआधीही अटक झाली आहे.
उके यांच्यावर इतरही गंभीर आरोप
सतीश उके यांनी फक्त विनयभंगच नाही केला तर इतरही अनेक गंभीर आरोप उके यांच्यावर फिर्यादीकडून करण्यात आले आहेत. फिर्यादीच्या मृत पतीच्या नावावर असलेली प्रॉपर्टी बनावट कागदपत्र तयार करून प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर केली, असा गंभीर आरोप फिर्यादीकडून उके यांच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे सतीश उके आता चांगलेच वादात सापडले आहेत. 52 वर्षीय फिर्यादीने उके यांच्याविरोधात ही तक्रार करत हे गंभीर आरोप केले आहेत. आणि याच फिर्यादीच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. वेळो वेळी लज्जा येईल असे कृत्य करून विनयभंग केला, असे फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तसेच उके यांनी वेळोवेळी मला धमकी दिली असाही आरोप फिर्यादीकडून करण्यात आला आहे.
उके यांच्या अडचणी वाढल्या
एवढ्या हायप्रोफाईल वकिलाविरोधात अशी तक्रार दाखल झाल्याने नागपुरात खळबळ माजली आहे. उके यांनी अनेक हायप्रोफाईल केसेसमध्ये युक्तीवाद केला आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही उके यांनी टीका केली होती. फडणवीसांनी दोन गुन्ह्याची माहिती लवल्याच्या प्रकरणात उके यांनी फडणवीसांविरोधात बाजू मांडली होती. त्यानंतर फडणवीसांन जामीन मिळाल्यानंतर उके यांनी फडणवीसांना त्यांचा अहंकार येथे घेऊन आला अशा शब्दात निशाणा साधला होता. त्यानंतरही ते चर्चेत राहिले होते.