संतापजनक! शारीरिक संबंधांना नकार… नंतर अश्लील फोटो व्हायरल करत केला विनयभंग

टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून त्याने शरीरसुखाची मागणी केली होती त्यास पीडितेने नकार दिल्याने रोहन याने पीडितेला धमकी दिली होती.

संतापजनक! शारीरिक संबंधांना नकार... नंतर अश्लील फोटो व्हायरल करत केला विनयभंग
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 20, 2022 | 6:36 PM

नाशिक : नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यातील एका दाखल गुन्ह्याने (Crime) खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे न्यूड फोटो व्हायरल (Photo Viral) करण्याची धमकी देत विनयभंग केल्याचे यामध्ये समोर आले आहे. टाकळी रोड परिसरात पीडितेला फ्लॅटमध्ये एकटी गाठून शारीरिक संबंधांची मागणी रोहन बंजारा याने केली होती. शरीर सुखाची मागणी केल्यांनतर नकार दिल्याने तरुणीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार 01 जून ते 19 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती समोर येत आहे. एकूणच या घटनेनं नाशिक शहरात खळबळ उडाली आहे. नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात रोहन बंजारा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून भद्रकाली पोलीसांकडून अधिकचा तपास केला जात आहे.

संशयित रोहन बंजारा हा मूळचा नंदुरबार जिल्ह्यातील असून तो गेल्या अनेक महिन्यांपासून नाशिकमध्ये राहत होता.

टाकळी परिसरातील एका फ्लॅटमध्ये पीडितेला गाठून त्याने शरीरसुखाची मागणी केली होती त्यास पीडितेने नकार दिल्याने रोहन याने पीडितेला धमकी दिली होती.

शरीर संबंधांना नकार दिल्याने संशयित रोहन बंजारा याने पीडितेचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

रोहन इथंवरच नाही थांबला, त्याने पीडितेच्या मोबाईल फोनने इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पीडितेच्या मित्र-मैत्रिणींना आणि नातलगांना अश्लील फोटो पाठविले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची तक्रार पीडितेने नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दिली आहे त्यावरून भद्रकाली पोलीसांनी रोहन बंजारा याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आणि त्यांचे पथक याबाबत अधिकचा तपास करीत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.