इस्रो, नासामध्ये नोकरीचं आमिष दाखवून शेकडो तरूणांची फसवणूक , 6 कोटी…

इस्रो, तसेच अमेरिकेतील नासामध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून पैसे उकळवत कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे याप्रकरणी ज्या तरूणांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली, तेच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

इस्रो, नासामध्ये नोकरीचं आमिष दाखवून शेकडो तरूणांची फसवणूक , 6 कोटी...
Image Credit source: प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 1:04 PM

इस्रो, तसेच अमेरिकेतील नासामध्ये नोकरी देतो, असे आमिष दाखवून पैसे उकळवत कोट्यवधींची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये घडला आहे. नोकरीचे आमिष दाखवून भामट्यांनी 1-2 नव्हे 100 हून अधिक तरूणांना स्वप्न दाखवली आणि त्यांचे पैसे लुटल्याची प्रकार उघडकीस आला आहे. इस्रो आणि नासामध्ये कनिष्ठ वैज्ञानिक, अधिकारी, संशोधक, लिपिक आणि अन्य कर्मचाऱ्यांची भरती असल्याचे सांगून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून भामट्यांच्या टोळीने तब्बल 111 लोकांची फसवणूक केली.

धक्कादायक गोष्ट म्हणजे याप्रकरणी ज्या तरूणांनी पोलिसांत जाऊन तक्रार दाखल केली, तेच आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अश्विन वानखडे आणि चेतन भोसले असे आरोपींचे नाव असून पोलिसांनी दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात हत्येच्या प्रकरणातील आरोपी व सूत्रधार ओंकार तलमले याला आधीच अटक झाली होती. आता आणखी दोन आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय झालं ?

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार तलमले याने नोकरी देण्याच्या आरोपाखाली हे रॅकेट सुरू केले होते. दोघांच्या हत्याप्रकरणी त्याला अटक झाल्यावर, त्याने केलेला हा फसवणुकीचा कारनामाही उघड झाला. अश्विन वानखेडे याने तक्रार केली होती. तक्रारीनुसार अश्विनने नातेवाईकाकडून एक लाख रुपये घेऊन ओंकारला दिले होते. ओंकारनेही त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याची नियुक्ती झाल्याचे सांगत बनावट नियुक्ती पत्रही दिले, मे 2020 मध्ये हा प्रकार घडला होता. या नोकरीत 50 हजार पगार असून कोरोनामुळे कमी पैसे मिळतील अशी थापही मराली.

काही काळ ओंकारने त्याला स्वतःच्या बँक खात्यातून पैसे दिले. यामुळे अश्विनचा विश्वास बसला व त्याने इतर नातेवाईक, मित्रांना याची माहिती दिली. त्यानंतर ओंकारने हीच शक्कल इतरांसाठी वापरली आणि १११ तरूण नोकरीच्या आमिषापायी त्याच्या जाळ्यात फसले. अशा प्रकारे ओंकारने या तरूणांकडून 5.30 कोटी घेले. तर अश्विन व आणखी एक आरोपी चेतन भोसले यांनी विविध लोकांकडून नोकरीच्या नावाखाली अनुक्रमे 2.47 लाख व एक कोटी रुपये स्वीकारल्याचे समोर आले.

अखेर याप्रकरणाचा भांडाफोड झाला आणि पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली. तर हत्येचा आरोप असलेला ओंकार आधीच पोलिसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.