चंद्रपुरात माय-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, उपासमार की कोरोना? कारण अस्पष्ट

चंद्रपूरमध्ये एका घरात आई-मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

चंद्रपुरात माय-लेकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला, उपासमार की कोरोना? कारण अस्पष्ट
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 10, 2021 | 3:10 AM

चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये एका घरात आई-मुलाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. वरोरा शहरातील नेहरु चौक परिसरात ही घटना घडली. द्रौपदा खोब्रागडे (85) आणि अंकुश खोब्रागडे (55) अशी मृत माय-लेकाची नावं आहेत. दोघांचाही मृत्यू 2 ते 3 दिवस आधी मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आज (9 एप्रिल) रात्री घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांनी कळवले. त्यानंतर या घटनेचा खुलासा झालाय (Mother and Son found dead in house in Chandrapur reason not clear).

द्रौपदी यांचा मुलगा अंकुश खोब्रागडे हा पोलिओने ग्रस्त होता. ते सातत्याने आजारी होते. ते अतिशय हलाखीच्या परिस्थितीत जगत होते. त्यामुळे या माय-लेकाचा मृत्यू उपासमारीने झाला की कोरोनामुळे झाला हे अद्याप स्पष्ट नाही. शवविच्छेदन (पोस्टमोर्टम) अहवालानंतरच दोघांच्या मृत्यूमागील कारण समजू शकणार आहे.

ऑक्सिजन पातळी खालावल्यानं मृत्यू

दरम्यान, चंद्रपुरात अन्य एका घटनेत कोरोनाबाधित रुग्णांला बेड न मिळाल्याने जीवाला मुकावं लागल्याची घटना घडलीय. चंद्रपूरच्या तुकुम भागातील एका केबल ऑपरेटरला वेळेत बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना पुढे आली आहे. या रुग्णाला होळी नंतर सर्दी-कफाच्या त्रासाने शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, ऑक्सिजन पातळी खालावत गेल्याने केलेल्या नमुने तपासणीत तो कोरोनाबाधित आढळून आला.

ऑक्सिजन पातळी कमालीची खालावल्याने व्हेंटिलेटरयुक्त बेडची गरज भासू लागली. नातेवाईकांनी यासाठी 48 तास प्रयत्न केले. मात्र त्यात यश आले नाही. सामान्य रुग्णालयातही बेडसाठी आधी होकार व नंतर नकार अशी स्थिती बघायला मिळाली. ज्या क्षणी बेड मिळाला त्यानंतर 15 मिनिटातच ऑक्सिजन पातळी अत्यंत खालावल्याने त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.

हेही वाचा :

डॉ. शीतल आमटे आत्महत्येचा गुंता सुटेना, मुंबई पोलिसांना टॅबचा Eye पासवर्ड शोधण्यात अपयश

चंद्रपुरात दारूबंदी उठवण्याच्या हालचाली, डॉ. अभय बंग यांचे मंत्रिमंडळाला 14 मुद्द्यांचे खरमरीत पत्र, वाचा…

Video | बळीराजाला अवकाळीचा पुन्हा तडाखा , काढणीला आलेली पिकं मातीमोल

व्हिडीओ पाहा :

Mother and Son found dead in house in Chandrapur reason not clear

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.