आईच्या सांगण्यावरून मुलीला ठार मारायला गेला, मुलीकडून चक्क लग्नाची ऑफर, गेम पलटला; पण खुनी थरार झालाच

उत्तर प्रदेशात एक अत्यंत धक्कादायक घटना घडलीय. एखाद्या सिनेमाची पटकथा शोभावी अशी ही घटना आहे. मुलीचं दोन मुलाबरोबर असलेलं प्रेमप्रकरण आईला खुपत नव्हतं. पण आईचंच एका व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू होतं. पुढे काय झालं?.............

आईच्या सांगण्यावरून मुलीला ठार मारायला गेला, मुलीकडून चक्क लग्नाची ऑफर, गेम पलटला; पण खुनी थरार झालाच
Marriage Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 7:33 PM

उत्तर प्रदेशातील एटामध्ये एका खुनाच्या घटनेने सर्वच सुन्न झाले आहेत. खुनामुळे तर लोक सुन्न झाले आहेत, पण या मर्डरच्या कथेमुळे अधिक सुन्न झाले आहेत. असंही घडू शकतं? असं कसं घडू शकतं? असा सवाल लोकांच्या मनात येत आहे. एखाद्या सिनेमातील कथा शोभावी अशीच ही घटना घडली आहे. एका महिलेचं अफेयर सुरू होतं. त्यामुळे तिने आपल्या प्रियकरालाच मुलीचा काटा काढण्यास सांगितलं. जेव्हा या महिलेचा प्रियकर मुलीची हत्या करण्यासाठी गेला, तेव्हा त्या मुलीने त्याला लग्नाची ऑफर दिली. त्यामुळे मारेकरी चक्रावला आणि पुढे जे घडलं त्याने सर्वच सुन्न झाले. ही मर्डर मिस्ट्री सोडवताना पोलिसांनाही नाकीनऊ आले होते. काय झालं होतं असं नेमकं?

एटाच्या नयागावच्या अल्हापूर येथेही घटना घडली. अलका नावाची 32 वर्षाची स्त्री तिचा नवरा आणि दोन अल्पवयीन मुलींसोबत राहत होती. आयुष्यात सर्वकाही व्यवस्थित सुरू होतं. पण याच काळात या महिलेचे तिच्या मुलीशी वाद होऊ लागला. या महिलेच्या मुलीचे दोन मुलांशी अफेयर होते, त्यावरून हा वाद होता. दोन्ही मुलं टुकार असल्याचं या महिलेचं म्हणणं होतं. त्यामुळे ती आपल्या मुलीला या दोन्ही मुलांपासून दूर ठेवू पाहत होती. पण मुलगी काही ऐकायला तयार नव्हती.

अचानक बॉडी सापडली

त्यामुळे या महिलेने अखेर अखिलेश आणि अनिकेत नावाच्या या दोन्ही मुलांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही वॉर्निंग देऊन सोडून दिलं. आता आपली मुलगी या दोन्ही मुलांशी बोलायचं बंद करेल असं अलकाला वाटलं होतं. पण तसं झालं नाही. तिची मुलगी त्यानंतरही या दोन्ही मुलांशी बोलायची. त्यानंतर अचानक अलकाची डेडबॉडी 6 ऑक्टोबर रोजी जसरथपूर परिसरात सापडली. महिलेचा नवरा रमाकांतने अखिलेश आणि अनिकेतवर हत्येचा संशय घेतला.

ताब्यात घेतलं, हाती काहीच नाही लागलं

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. दोघांनाही ताब्यात घेतलं. त्यांची कसून चौकशी केली. पण त्यांना काहीच पुरावा मिळाला नाही. त्यानंतर पोलिसांनी अलकाची कॉल रेकॉर्डिंग शोधली. त्यावेळी तिच्या माहेरी असणाऱ्या सुभाष नावाच्या व्यक्तीशी अलकाची वारंवार फोनवरून चर्चा होत असल्याचं निदर्शनास आलं. अलकाचं बऱ्याच काळापासून सुभाष सोबत अफेयर सुरू होतं. सुभाष 10 वर्षापासून बलात्काराच्या एका प्रकरणात तुरुंगात होता. सात महिन्यांपूर्वीच तो शिक्षा संपवून तुरुंगातून आला होता. अलका निरंतर त्याच्या संपर्कात होती. दोघांमध्ये तास न् तास बोलणं व्हायचं.

सुभाष आणि अलकाची मुलगी फरार

पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कंबर कसली. त्याचवेळी सुभाष फरार असल्याची टीप पोलिसांना लागली. पोलिसांनी अलकाच्या मोठ्या मुलीबाबतची माहिती घेण्यास सुरुवात केली. तेव्हा तीही फरार असल्याचं आढळून आलं. त्यानंतर खबरींकडून पोलिसांच्या हाती अशी माहिती आली की ज्यामुळे संपूर्ण केसच पलटून गेली. सुभाष आणि अलकाची मुलगी रात्री उशिरापर्यंत नगला कलू परिसरात होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर 10 ऑक्टोबर रोजी म्हणजे काल पहाटे 5 वाजून 52 मिनिटांनी पोलिसांनी नगला कलू येथून सुभाष आणि अलकाच्या मुलीला अटक केली.

लग्नानंतरही अफेयर

त्यानंतर या दोघांनी पोपटासारखं तोंड उघड जी कहाणी ऐकवली त्याने पोलिसांचं डोकंच भणभणलं. आपलं अलकासोबत अफेयर होतं, असं सुभाषने सांगितलं. लग्नानंतरही दोघांमध्ये अफेयर होतं. काही महिन्यापूर्वी अलकाने तिच्या मोठ्या मुलीची तक्रार केली. मोठी मुलगी दोन तरुणांसोबत सतत बोलत असते. त्यामुळे आपण त्रस्त आहोत, असं अलकाने सांगितलं होतं. त्यावर आपण अलकाला खूप समजावल्याचं सुभाष म्हणतो. मी अनेकदा तिला समजावलं. पण ती समजण्याच्या पलिकडे होती. त्यानंतर अलकाने मला थेट मुलीचा खात्मा करायला सांगितलं. त्याबदल्यात 50 हजार रुपये देणार असल्याचंही अलका म्हणाली, असं सुभाष म्हणाला.

आग्र्याला दोघे आलो

अलकाच्या जाळ्यात मी अडकलो. त्यानंतर एक दिवस मी अलकाच्या मुलीला घेऊन घेलो. मी तुला मारून टाकणार आहे, असं मी तिला सांगितलं. तुझ्या आईने तुला मारण्याची मला सुपारी दिली आहे, असं मी तिला सांगितलं. त्यामुळे अलकाची मुलगी हादरली. ती मला बिलगून रडून लागली. त्यानंतर मला तिची किव आली. मी तुला मारणार नाही, असं मी तिला सांगितलं. त्यानंतर मी तिला घेऊन आग्र्याला आलो. तिकडे मी अलकाला तिच्या मुलीचं काम तमाम केल्याचं सांगितलं. तसेच अलकाकडे 50 हजार रुपये मागितले. पण ती बहानेबाजी करू लागली.

पैसे मिळालेच नाही

दोन तीनवेळा सांगितल्यानंतरही अलकाने मला पैसे दिले नाहीत. त्यामुळे मी तिला खरं ते सांगून टाकलं. तुझ्या मुलीला घेऊन जा असं मी तिला सांगितलं. त्यावर माझ्यासमोर माझ्या मुलीचा खून कर, त्याचवेळी मी तुला पैसे देईन, असं ती म्हणाली. मी ही गोष्ट अलकाच्या मुलीला सांगितली. त्यावर तिने मला थेट लग्नाची ऑफर दिली. तू माझ्या आईला ठार केलं तर मी तुझ्याशी लग्न करेन असं ती म्हणाली. त्यानंतर मी मनाशी पक्की खुणगाठ बांधली. अलकाला भेटायला बोलावलं. तिला जबर मारहाण करून अर्धमेलं केलं. त्यानंतर तिचा गळा दाबून तिला मारून टाकलं, असं तो म्हणाला.

गुन्हा कबूल

पोलिसांच्या समोर अलकाच्या मुलीनेही हा गुन्हा कबूल केला आहे. सध्या दोघेही पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. दुसरीकडे अलकाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करून त्यांच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला आहे.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.