Baba bageshwar | ‘मी ब्राह्मण आहे, मग मी काय….’, भर कार्यक्रमात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री खवळले, काय झालं?
Bageshwar dham : 'या' समाजाबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केली आहे. लोक म्हणाले, कारवाई करा नाहीतर धर्म बदलू. युवकाला त्यांनी मंचावरुनच चॅलेंज केलं. त्यावेळी युवक म्हणाला की, मी ब्राह्मण आहे.
भोपाळ : प्रसिद्ध कथावाचक आणि बागेश्वर धामचे पीठाधीश्वर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. यावेळी पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर दलित बसोर (बंशकार) समाजाबद्दल आपत्तीजनक टिप्पणी केल्याचा आरोप आहे. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वक्तव्यामुळे बसोर समाजामध्ये अपमानित झाल्याची भावना आहे. समाजाकडून अनुसूचित जाती आणि जनजाती अधिनियमातर्गत पोलीसात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीच्या आधारावर तपास सुरु केला आहे. बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री त्यांच्या दिव्य दरबारात एका युवकासोबत बोलत होते. बाबा बागेश्वर यांनी काढलेल्या एका चिठ्ठीवर युवकाने आक्षेप घेतला. त्यावर बाबा भडकले.
युवकाला त्यांनी मंचावरुनच चॅलेंज केलं. त्यावेळी युवक म्हणाला की, मी ब्राह्मण आहे. त्यावर मी काय बसोर आहे? असं खवळलेले पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले. त्यावेळी बाबा आणि त्या युवकामध्ये बराचवेळ वादावादी झाली. बाबा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी 2 सप्टेंबरला हे वक्तव्य केलं होतं. त्यांच्या बाकी व्हिडियोजप्रमाणे हा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. अन्य चॅनल्सनी हा व्हायरल व्हिडिओ आपल्या अकाऊंटवर शेअर केला. त्यामध्ये बाबा स्पष्टपणे बोलताना दिसतात. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री राजस्थानच्या सीकरमध्ये होते, त्यावेळी ही घटना घडली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर छतरपूरमधील दलित बसोर समाजाने अजाक पोलीस ठाण्यात पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे. समाज सोडण्याची धमकी
राजस्थानात सीकरच्या खुल्या मंचावरुन बागेश्वर बाबा यांनी समाजाचा अपमान केला असा आरोप बसोर समाजाने केला आहे. या वक्तव्यानंतर समाजातील लोकांची अपमानित झाल्याची भावना आहे. बसोर समाजाच्या लोकांनी इशारा दिला आहे. जर, पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि जनजाती अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल झाला नाही, तर देशभरात मोठ आंदोलन करु. बसोर समाजसोडून बौद्ध धर्म स्वीकारु असं त्यांनी म्हटलय.