एक नवरा, दोन बायका, दोघी नवऱ्यासोबत राहण्यासाठी बेचैन, अखेर कोर्टाने दिला असा आदेश

कोर्टाच्या निर्णयामुळे दोघीपण खुश. त्या 15 वर्षात खटला सुरु असताना, व्यक्तीने दुसरं लग्न केलं. त्या विवाहापासून त्याला दोन मुलं आहेत. त्यांना नवऱ्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायच नव्हतं.

एक नवरा, दोन बायका, दोघी नवऱ्यासोबत राहण्यासाठी बेचैन, अखेर कोर्टाने दिला असा आदेश
how will husband live with two wives
Follow us
| Updated on: Aug 25, 2023 | 1:39 PM

भोपाळ : एका व्यक्तीने दोन लग्न केली. दोन्ही बायकांना नवऱ्यासोबतच रहायच होतं. त्यांना नवऱ्याला आपल्यापासून दूर होऊ द्यायच नव्हतं. त्यावरुन त्यांच्यात भांडण सुरु होती. अखेर हे प्रकरण परामर्श न्यायालय गेलं. त्यात न्यायालयाने दोघींना समान न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. घटिया येथे राहणाऱ्या व्यक्तीने 15 वर्षांपूर्वी बामोरा येथे राहणाऱ्या महिलेबरोबर लग्न केलं. काही काळापर्यंत पती-पत्नीमध्ये सगळं काही सुरळीत सुरु होतं.

त्यांना एक मुलगाही झाला. हळूहळू पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. हा वाद न्यायालयात पोहोचला. न्यायालयात या प्रकरणात निकाल लागायला 15 वर्ष लागली. त्या व्यक्तीला आपल्या पत्नीसोबतच रहाव लागेल, असा कोर्टाने आदेश दिला. मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील हे प्रकरण आहे.

दोघींना नवरा हवा होता, पण….

न्यायालयाने त्या व्यक्तीला पत्नीसोबत राहण्याचे आदेश दिले. पण त्या 15 वर्षात खटला सुरु असताना, त्या व्यक्तीने दुसरं लग्न केलं. त्या विवाहापासून त्याला दोन मुलं आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर पहिली पत्नी त्या व्यक्तीसोबत रहायला त्याच्या घरी गेली. यामुळे त्याच्या संसारात वादळ निर्माण झालं. कारण दोघींना नवरा हवा होता. पण त्यांना एकत्र रहायच नव्हतं. त्यावरुन पुन्हा वाद झाला. त्याची दुसरी बायको नवऱ्याला सोडून उज्जैन येथे आपल्या माहेरी निघून गेली. न्यायालयाचा आदेश काय?

त्या व्यक्तीच्या दुसऱ्या पत्नीने परामर्श केंद्रात तक्रार दाखल केली होती. पती सोबत राहण्यासाठी तिने ही तक्रार केली होती. परामर्श केंद्राने त्या व्यक्तीला आणि त्याच्या दोन्ही बायकांना बोलवून त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही बायका ऐकून घ्यायला तयार नव्हत्या. अखेर परिवार परामर्श न्यायालयाने एक निर्णय दिला. त्यामध्ये पतीला पहिले 15 दिवस पहिल्या पत्नीसोबत आणि नंतरचे 15 दिवस दुसऱ्या पत्नी सोबत रहाण्याचा आदेश दिला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.