Mukhtar Ansari death : ‘आमचा भाऊ शहीद झाला’, गँगस्टर, बाहुबली मुख्तारवर तुरुंगात विष प्रयोग का?

"मुख्तार अंसारीला विष दिल जात होतं. काही दिवसांपूर्वी जेलमधल्या कर्मचाऱ्यांनी मुख्तारला दिल्या जाणाऱ्या जेवणाचा स्वाद चाखलेला, त्यावेळी त्या सर्वांना रुग्णालयात दाखल कराव लागलेल" असं सिबगतुल्लाह अंसारीने म्हटलं.

Mukhtar Ansari death : 'आमचा भाऊ शहीद झाला', गँगस्टर, बाहुबली मुख्तारवर तुरुंगात विष प्रयोग का?
mukhtar ansari death reaction of brother sibgatullah ansari
Follow us
| Updated on: Mar 29, 2024 | 9:08 AM

कुख्यात गँगस्टर मुख्तार अंसारीचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी रात्री ह्दय विकाराच्या झटक्याने मुख्तार अंसारीच निधन झालं. मुख्तारच्या मृत्यूवर त्याचा मोठा भाऊ सिबगतुल्लाह अंसारीने प्रतिक्रिया दिली आहे. “आमचा भाऊ शहीद झाला. शहीद होण्यासारखा चांगला मृत्यू नाही. आमच्या धर्मानुसार कोणाला विष देऊन मारलं, तर तो शहीद होतो. शहीद होण्यासारखा दुसरा चांगला मृत्यू नाही” असं सिबगतुल्लाह अंसारीने म्हटलय. सिबगतुल्लाह अंसारीने सांगितलं की, “मुख्तार अंसारीला विष दिल जात होतं. काही दिवसांपूर्वी जेलमधल्या कर्मचाऱ्यांनी मुख्तारला दिल्या जाणाऱ्या जेवणाचा स्वाद चाखलेला, त्यावेळी त्या सर्वांना रुग्णालयात दाखल कराव लागलेल. ईश्वराने मुख्तारच्या नशिबी शहीद होण लिहील होतं. आमच्या धर्मानुसार कोणाला विष देऊन मारलं, तर तो शहीद ठरतो. यापेक्षा दुसरा चांगला मृत्यू असू शकत नाही”

“मुख्तारला काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. त्याचा ब्लड रिपोर्ट नॉर्मल होता. ऑपरेशनची परवानगी दिल्यानंतरही ऑपरेशन करु दिलं नाही. हे सर्वांसमोर आहे. सर्व हुशार आहेत. सगळ्यांना माहितीय, मोठा कट रचण्यात आला होता. कोणाला काय सांगायच. देवच न्याय करेल” असं सिबगतुल्लाह अंसारी म्हणाले.

आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट का मान्य करायचा?

“मुख्तारला हार्ट अटॅक कधीच आला नव्हता. या बद्दल आम्ही सुप्रीम कोर्टापासून प्रत्येक कोर्टात बोललो आहोत. तो सिंहासारख राहीला. सिंहासारखाच या जगातून गेला. त्याच आयुष्यच इतक होतं. ईश्वर याचा बदला घेईल. आम्ही पोस्टमॉर्टम रिपोर्ट का मान्य करायचा?. मुख्तारने आयुष्यभर संघर्ष केला. कधी कोणासमोर झुकला नाही” असं सिबगतुल्लाह म्हणाले.

‘पण मला भेटू दिलं नाही’

मुख्तार अंसारीचा मुलगा उमर अंसारीने स्टेटमेंट दिलय. “मला प्रशासनाकडून काही सांगण्यात आलं नाही. मला मीडियाकडून माहिती मिळाली. दोन दिवसांपूर्वी मी त्यांना भेटायला आलो होतो. पण मला भेटू दिलं नाही. आम्ही आधी सुद्धा म्हटलय, आता सुद्धा तेच म्हणतोय त्यांच्या विष प्रयोग करण्यात आला. 19 मार्चला रात्रीच्या जेवणातून विष देण्यात आलं होतं. आम्ही न्यायालयात जाऊ” असं उमर अंसारीने म्हटलय.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.