Mahalakshmi Case Update : महालक्ष्मीचे 59 तुकडे करणाऱ्या मुक्तीचा 3 महिन्यांचा फुलप्रूफ प्लान, कसा झाला खुलासा ?
बंगळुरूतील बहुचर्चित महालक्ष्मी हत्या प्रकरणात एक मोठं अपडेट समोर आला आहे. खुनी मुक्ती रंजनला आत्महत्या करायची नव्हती. त्याने तर तीन महिन्यांचा फुलप्रूफ प्लानही तयार केला होता. काय होता त्याचा नेमका प्लान ?
कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये काही दिवसांपूर्वी सेल्सवुमन महालक्ष्मी हिच्या हत्येचं हादरवणारं प्रकरण समोर आलं होतं. आरोपीने अत्यंत निर्दयपणे आणि क्रूरपणे महालक्ष्मीची हत्या केली, तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे करून फ्रीजमध्येही ठेवले. 21 सप्टेंबरला या भयानक हत्याकांडाचा उलगडा झाला. मारेकऱ्याच्या शोधार्थ पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा महालक्ष्मीचा मारेकरी मुक्ती रंजनचा मृतदेह सापडला. त्याने आत्महत्या केली होती, मात्र स्वत:चा जीव देण्याचा त्याचा कोणताही प्लान नव्हता. या क्रूर मारेकऱ्याने तर पुढच्या तीन महिन्यांसाठी एक फुलप्रूफ प्लानही आखला होता.
महालक्ष्मीच्या मृतदेहाच्या 59 तुकड्यांची विल्हेवाट कुठे आणि कशी लावायची. त्यासाठी त्याने तयारीही केली होती. तीन महिने तो शांत राहणार होता. त्यानंतर त्या तुकड्यांची विल्हेवाट लावणार होता. खुद्द मारेकऱ्याचा भावानेच हा खुलासा केला आहे.
मुक्ती रंजन याने 2 सप्टेंबर रोजी पहाटे 2 वाजता वायलीकवल येथील सेल्सवुमन महालक्ष्मीचा खून केला होता. त्यानंतर मारेकऱ्याने महालक्ष्मीचे 59 तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले आणि तेथून पळ काढला. अनेक दिवस फ्लॅट बंद होता. त्यामुळे तिथे असं काही कांड झालं आहे, याचा कोणालाच काहीही सुगावा लागला नाही. मात्र 21 सप्टेंबरला तिच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली, तेव्हा शेजाऱ्यांनी महालक्ष्मीच्या आईला याबद्दल कळवलं.
त्यानंतर महालक्ष्मीची आई तिच्या घरी आली, तिची बहीणही सोबत होती, तेव्हा या हत्याकांडाचा खुलासा झाला. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. खोलीमध्ये सर्वत्र रक्ताचे डाग होते. सामान विखुरलेलं, दुर्गंधी येत होती. तिथे उभं राहण सुद्धा कठीण होतं. आई फ्रिजजवळ गेली. तिने फ्रीजचा दरवाजा उघडताच आतमध्ये मृतदेहाचे अनेक तुकडे होते. ते दृश्य पाहून दोघी मोठ्याने किंचाळल्या. मात्र महालक्ष्मीची अशी निर्घृणपणे हत्या कोणी केली, मारेकरी कोण याबद्दल कोणालाच काहीही माहिती नव्हती.
पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला, त्यांच्या संशयाची सुई सर्वप्रथम महालक्ष्मीचा पती हेमंत याच्याकडे वळली. मात्र त्याचा काही संबध नसल्याचे उघड झाले. त्यानंतर अशरफ नावाच्या इसमाचाही पोलिसांना संशय आला. मात्र दोघांचाही या हत्येशी दुरान्वयेही संबंध नसल्याचे समोर आले. पोलिसांनी याला दुजोरा देताच तपासाची व्याप्ती आणखी वाढवण्यात आली. रात्रंदिवस सखोल तपास सुरू होता. पोलिसांची ही मेहनत अखेर सफल ठरली आमि मारेकरी सापडला.
3 महिन्यांचं प्लानिंग
पण पोलिसांच्या हाथी लागण्यापूर्वीच मारेकऱ्याने 25 सप्टेंबर रोजी ओडिशातील भद्रक शहरात त्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं, खरंतर त्याला जीव द्यायचा नव्हता. मुक्ती रंजन रॉय याचा भाऊ सत्याने पोलिसांना सांगितलं की, मुक्ती गेल्या 9 दिवसांपासून माझ्याकडे राहत होता. त्यानंतर त्याने महालक्ष्मीची हत्या केल्याची कबुली दिली. दोन ते तीन महिन्यांनंतर तो तिच्या मृतदेहाच्या तुकड्यांची हळूहळू विल्हेवाट लावणार होता, कोणालाही काहीच कळलं नसतं
भीतीमुळे संपवलं आयुष्य
मात्र पोलिसांना जेव्हा मुक्तीबद्दल सर्व काही कळले तेव्हा तो घाबरला. पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचू नयेत,यासाठी 25 सप्टेंबर रोजी मुक्ती काहीही न बोलता भावाच्या घरातून निघून गेला. सोबत लॅपटॉप आणि डायरी घेतली . सकाळच्या वेळी तो वडिलांची स्कूटर घेऊन भावाच्या घरातून बाहेर पडला. तिथून तीन किलोमीटरवर एक कब्रस्तान होतं. स्कूटर थांबवून तो तिथे गेला आणि एका झाडाला दोरीचा फास बांधून त्याने गळफास घेत आयुष्य संपवलं. त्यानंतर स्मशानभूमीत आलेल्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली. ती व्यक्ती कोण होती आणि त्याने आत्महत्या का केली हे सुरुवातीला समजू शकले नाही. पण थोड्या वेळाने त्याची खरी माहिती समजली. ओडिशा पोलिसांनी बंगळुरू पोलिसांना याची माहिती दिली. सध्या याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
सुसाइड नोटमध्ये हत्येचं कारण काय सांगितलं?
“मी 3 सप्टेंबरला महालक्ष्मीची हत्या केली. त्या दिवशी महालक्ष्मीच्या घरी गेलेलो. आमचं कुठल्यातरी विषयावरुन भांडण झालं. त्यावेळी महालक्ष्मीने माझ्यावर हल्ला केला. मला हे आवडलं नाही. मी रागाच्या भरात तिची हत्या केली. मी तिच्या मृतदेहाचे 59 तुकडे केले ते फ्रिजमध्ये ठेवून तिथून पळून गेलो. मला महालक्ष्मीच वागणं अजिबात आवडलं नव्हतं. तिच्या हत्येचा मला पश्चाताप आहे. मी रागाच्या भरात जे केलं, ते चुकीचच होतं. मी घाबरलो, म्हणून तिथून पळून गेलो” असं मुक्तीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.