ऑटोरिक्षा हत्याकांड : त्याच्या ॲग्रेसिव्ह स्वभावामुळे तिने ३ महिन्यांपूर्वीच तोडले संबंध, पण ‘त्या’ शेवटच्या भेटीने घात केला..

प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:वरही वार केल्याने तो जखमी झाला होता. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऑटोरिक्षा हत्याकांड : त्याच्या ॲग्रेसिव्ह स्वभावामुळे तिने ३ महिन्यांपूर्वीच तोडले संबंध, पण 'त्या' शेवटच्या भेटीने घात केला..
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीसह मुलीला संपवले
Follow us
| Updated on: Jun 21, 2023 | 11:54 AM

मुंबई : धावत्या ऑटोरिक्षात एका महिलेचा गळा चिरून तिची हत्या झाल्याच्या (woman killed in rickshaw) घटनेने संपूर्ण मुंबई हादरली. मुंबईतील हॉस्टलमधील तरूणीवर अत्याचार करून तिची हत्या आणि मीरा-रोड येथे इसमाने पार्टनरची क्रूरपणे हत्या करून तिचे तुकडे केल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी रिक्षात झालेल्या हत्येने पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. याप्रकरणी आता आणखी माहिती समोर येत असून मृत महिलेने तिच्या बॉयफ्रेंडसोबत तीन महिन्यांपूर्वीच सर्व संबंध तोडले होते, असे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या आक्रमक आणि वर्चस्व गाजवण्याच्या (aggressive and dominating) स्वभावाला कंटाळून महिलेने त्याच्याशी बोलणेच बंद केले होते, असेही पोलिसांनी नमूद केले.

पंचशीला अशोक जामदार (३०) असे मृत महिलेचे नाव असून दीपक बोरसे (वय २८) याने रिक्षात तिचा गळा चिरून हत्या केली. एवढेच नव्हे तर त्यानंतर त्याने त्याच चाकूने स्वत:वरही वार करून घेतल्याने तो जखमी झाला होता. मात्र त्याने धावत्या रिक्षातूनच उडी मारली व तो फरार झाला होता. अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असून त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्याची चौकशी करण्यात येत आहे.

घटस्फोटानंतर ती महिला मुलांसह रहात होती

पोलिसांनी केलेल्या चौकशी दरम्यान बोरसेने बरीच माहिती उघड केली. मृत महिला पंचशीला जामदार ही साकीनाका येथील रहिवासी होती. तिची व दीपकची बऱ्याच वर्षांपासून ओळख होती आणि तो तिच्या प्रेमात पडला होता, असे त्याने सांगितले. वारंवार होणाऱ्या घरगुती अत्याचारानंतर पंचशीलाने पतीला घटस्फोट दिला आणि ती दोन मुलांसह रहात होती, असेही बोरसेने नमूद केले.

जमादार हिच्या लग्नापूर्वीच तिची बोरसे याच्याशी ओळख झाली होती, मात्र गेल्या दोन वर्षांपासून ते एकमेकांच्या प्रेमात होते. बोरसे याचा आक्रमक स्वभाव माहीत असल्याने पंचशीला हिच्या आई-वडिलां त्यांच्या नात्याला विरोधा होता, मात्र त्यानंतरही ते दोघे उल्हासनगर येथे एकत्र रहात होते. मात्र लग्नाच्या विषयावरून वारंवार होणाऱ्या भांडणामुळे पंचशीला हिने तीन महिन्यांपूर्वी दीपकशी सर्व संबंध तोडले आणि ती चांदिवली येथे तिच्या आई-वडिलांसोबत राहू लगाली. मात्र तिने आपल्याकडे परत यावे अशी मागणी करत बोरसे तिला छळत होता.

आधीच आखला होता हत्येचा प्लान

सोमवारी दीपक बोरसे याने जमादार हिला फोन करून शेवटची भेट घेण्यास बोलावले. ते दोघे घाटकोपर येथे भेटले आणि तेथून ते रिक्षात बसून पुढे निघाले. तिला भेटण्यापूर्वीच बोरसेने हत्येची योजना आखली होती. त्यामुळे त्याने त्याच्यासोबत चाकू ठेवला होता. रिक्षात बसल्यावर त्यांच्यात पुन्हा वाद झाला आणि धावत्या रिक्षातच त्याने तिचा गळा चिरला. त्याने धावत्या रिक्षातूनच खाली उडी मारली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी अंगावर चाकूने वार करत तो स्वत:ही जखमी झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

घाटकोपरच्या राजावाडी परिसरातून पोलिसांना ही बाब कळल्यानंतर अवघ्या तासाभरात पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याच्या मुसक्या आवळल्या. मंगळवारी त्याला न्यायालयासमोर सादर करण्यात आले असता बोरसे याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.