आईच्या मोबाईलमध्ये ‘ही’ गोष्ट पाहताच मुलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मुलाने थेट…

मुंबईच्या चुनाभट्टीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका मुलाने त्याच्या आईच्या मोबाईलमध्ये काही व्हिडीओ आणि फोटो पाहिले आणि तो संतप्त झाला. यानंतर त्याने जे कृत्य केलं त्यामुळे संबंधित परिसर हादरला आहे.

आईच्या मोबाईलमध्ये 'ही' गोष्ट पाहताच मुलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मुलाने थेट...
आईच्या मोबाईलमध्ये 'ही' गोष्ट पाहताच मुलाच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि मुलाने थेट...
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 4:44 PM

कोणताही चुकीचा प्रकार निदर्शनास आला की त्यावर आपण आपली प्रतिक्रिया देतो. मग ती प्रतिक्रिया शारीरिक असते किंवा शाब्दिक देखील असू शकते. असे प्रकार समोर आले तेव्हा आपण आक्रमक व्हायला नको. याउलट आपण शांतपणे त्यातून उपाय कसा शोधता येईल किंवा मार्ग कसा काढता येईल? याबाबत विचार करायला हवा. आक्रोश करुन किंवा एखाद्यावर संतापून, किंवा त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करुन काहीच साध्य होणार नाही. उलट आपल्या या अशा कृतीमुळे आपल्याला स्वत:ला मनस्तापाला सामोरं जावं लागू शकतं आणि प्रचंड पश्चात्ताप करावा लागू शकतो. त्यामुळे रागाच्या भरात नको ते पाऊल उचलणं हे आपल्यासाठी आणि आपल्या जवळच्या व्यक्तींसाठीदेखील हानीकारक ठरु शकतं. मुंबईत चुनाभट्टीत एका इयत्ता नऊवीत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने जे कृत्य केलं आहे त्यामुळे त्याची आई आज मृत्यूशी संघर्ष करत आहे. या घटनेनंतर मुलाला बाल सुधारणगृहात पाठवण्यात आलं आहे. पण या घटनेमुळे चुनाभट्टी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईमध्ये एका 14 वर्षीय मुलाने सख्या आईचा खून करण्याचा प्रयत्न केला. मुंबईतील चुनाभट्टी परिसरात ही धक्कादायक घटना घडली. संबंधित कृत्य करणारा मुलगा हा नऊवीमध्ये शिकत असून त्याला आईच्या फोनमध्ये कथित प्रियकरासह अश्लील फोटो आणि व्हिडिओ सापडले. त्यानंतर त्याने आईचा गळा चिरुन तिला गंभीर जखमी केले आहे. मुलाच्या आईला सध्या सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती सध्या स्थिर आहे. याप्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला आहे

हे सुद्धा वाचा

पोलिसांनी संबंधित युवकाला डोंगरी येथील बाल सुधारगृहात पाठवले आहे. मुलगा आईच्या मोबाईलवर गेम खेळत होता आणि गेम खेळता-खेळता आईचे आणि तिच्या कथित प्रियकराचे काही अश्लील व्हिडिओ आणि फोटो त्याला दिसले. यानंतर रागाच्या भरात त्याने हे कृत्य केले, अशी माहिती समोर येत आहे. या प्रकरणी आता पोलिसांचा पुढील तपास सुरु आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.