मुंबईत ‘या’ अॅपद्वारे व्हिडीओ चॅट सेक्स रॅकेट, अनेक मुलींना ओढलं जाळ्यात

चॅमेट या अॅप्लीकेशनवर रजिस्ट्रेशन केलेल्या भारतीय तसेच परदेशी नागरिकांना फ्री चॅटिंग आहे असे भासवले जायचे. अॅप ओपन केल्यानंतर त्यांच्याशी मुली अश्लील संभाषण करत असत. तसेच नागरिकांकडून डिजिटल डायमंडच्या स्वरुपात पैसे घेतले जायचे.

मुंबईत 'या' अॅपद्वारे व्हिडीओ चॅट सेक्स रॅकेट, अनेक मुलींना ओढलं जाळ्यात
मुंबईत 'या' अॅपद्वारे व्हिडीओ चॅट सेक्स रॅकेटImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 31, 2022 | 1:20 AM

मुंबई : अश्लील व्हीडिओ सेक्स चॅट अॅप (Video Sex Chat App)चा पर्दाफाश करत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 11 ने एका आरोपीला अटक (Arrest) केले आहे. ब्रिजेश शोनविल्यंस असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून 17 मुलींची सुटका (Rescued) केली. तसेच घटनास्थळावरुन 19 मोबाईल फोन, एक लॅपटॉप आणि इतर साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला

आरोपी ब्रिजेश हा गेल्या आठ महिन्यांपासून मालाड पश्चिमेतील काचपाडा येथे हे सेक्स रॅकेट चालवत होता. पोलीस निरीक्षक विनायक चव्हाण यांना या ठिकाणी चॅमेट या ऑनलाईन चॅट अॅपद्वारे अश्लील व्हिडिओ सेक्स सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला.

पोलिसांनी धाड टाकली असता सदर ठिकाणी ऑनलाईन सेक्स रॅकेट चालू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी हे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी रॅकेटमधील 12 मुली आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या 5 मुली अशा एकूण 17 मुलींची सुटका केली.

हे सुद्धा वाचा

काय आहे प्रकरण ?

चॅमेट या अॅप्लीकेशनवर रजिस्ट्रेशन केलेल्या भारतीय तसेच परदेशी नागरिकांना फ्री चॅटिंग आहे असे भासवले जायचे. अॅप ओपन केल्यानंतर त्यांच्याशी मुली अश्लील संभाषण करत असत. तसेच नागरिकांकडून डिजिटल डायमंडच्या स्वरुपात पैसे घेतले जायचे. समोरील चॅट करणाऱ्या मुलीला डिजिटल डायमंड दिल्यास मुली ऑनलाईन व्हिडिओ कॉलवर अश्लील हावभाव आणि सेक्स चॅट करत असत. (17 girls freed by Mumbai police busting obscene video chat app)

'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.