अपघाताचा बनाव करुन मुंबईत 35 लाखांची लूट, 25 ठिकाणांचे CCTV फुटेज तपासून आरोपीला अटक
मुंबईतील समतानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याच्या गाडीतून 35 लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी दिंडोसी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय महामार्गावरील दरोडेखोर टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. अहमदाबादमधील उंजा गावात महिसाणा रस्त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
मुंबई : मुंबईतील (Mumbai) समतानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका व्यापाऱ्याच्या गाडीतून 35 लाखांचा ऐवज लुटल्याप्रकरणी (35 lakh robbery) दिंडोसी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय महामार्गावरील दरोडेखोर टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. अहमदाबादमधील उंजा गावात महिसाणा रस्त्यावरून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपींकडून 11 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.
अहमदाबादवरून यायचे, रेकी करायचे
या टोळीतील लोक अहमदाबादहून मुंबईला दुचाकीने येत होते आणि दरोडा टाकून ते परत अहमदाबादला जात होते. अटक करण्यात आलेला आरोपी दिल्लीचा रहिवासी आहे असून तोच मास्टरमाईंड देखील आहे. मुंबई पोलीस झोन 12 चे डीसीपी सोमनाथ घार्गे यांनी सांगितले की, आरोपी अहमदाबादहून मुंबईत येतो आणि आधी रेकी करतो. त्यानंतर गुन्हा करून तो अहमदाबादला पळून जातो.
पाठलाग करून अपघाताचा बहाणा
काही दिवसांपूर्वी समतानगर येथील दरोड्याच्या घटनेत ही टोळी मुंबईत आली होती. मालाडच्या डायमंड मार्केटमध्ये दोन जण रेकी करत होते. फिर्यादी सुनील गुजर यांनी पैशांनी भरलेली बॅग त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या फॉर्च्युनर कारमध्ये ठेवताच टोळीतील अन्य साथीदारांनी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे समतानगरजवळ कारचा पाठलाग करून अपघाताचा बहाणा करत कारच्या पुढे दुचाकी लावली आणि काही जणांना मारहाण केली.
25 हून अधिक ठिकाणचे CCTV चेक करून शोध लावला
लोकांसोबत कार मालकाशी बाचाबाची झाली आणि त्याच संधीचा फायदा घेत. इतर साथीदारांनी कारची काच फोडून मागील शीटमध्ये ठेवलेली 35 लाख रुपयांनी भरलेली बॅग घेऊन पलायन केले. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि 25 हून अधिक ठिकाणचे CCTV फुटेज तपासले. तपासात ही टोळी अहमदाबादच्या छारानगर येथून कधी दुचाकीने तर कधी खासगी बसने मुंबईत येत असे. मुंबईत सलग 2 ते 3 घटना घडवून ते पळून जायचे. सध्या दिंडोशी पोलिसांनी आरोपी पंकज मिश्रा (34) याला अहमदाबाद येथून अटक केली असून तो दिल्लीचा रहिवासी आहे.
संबंधित बातम्या :
प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी मुलाच्या अपहरणाचा बनाव, मुंबईत विवाहितेला अटक