Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : व्यावसायिकाचे अपहरण करणे भोवले, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गुन्हा दाखल

व्यावसायिकाचे अपहरण करुन बंदुकीचा धाक दाखवून धमकावणे चांगलेच अंगलट आले आहे. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाच्या अडचणी वाढणार.

Mumbai Crime : व्यावसायिकाचे अपहरण करणे भोवले, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलावर गुन्हा दाखल
व्यावसायिकाच्या अपहरण प्रकरणी प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह काही जणांवर गुन्हा दाखलImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 10, 2023 | 9:56 AM

मुंबई / 10 ऑगस्ट 2023 : बंदुकीच्या धाकावर व्यावसायिकाचे अपहरण केल्याप्रकरणी आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलासह काही लोकांवर वनराई पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवि कलम 364-A, 452, 143, 147, 149, 323, 504 आणि 506 व 3, 25 शस्त्रास्त्र अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. राज सुर्वे असे आरोपी आमदार पुत्राचे नाव आहे. तसेच मनोज मिश्रा, विकी शेट्टी आणि 10 ते 12 अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. वनराई पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. राजकुमार जगदीश सिंग असे त्यांचे नाव असून, ते एका म्युझिक कंपनीचे सीईओ आहेत.

काय आहे प्रकरण?

राजकुमार सिंग यांची गोरेगाव पूर्व येथे ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा. लि. नावाची कंपनी असून, सदर कंपनी डिजिटल लॅटरल स्वरुप ठेवून लोन देण्याचे काम करते. आरोपींपैकी एक मनोज मिश्रा याची पीडितसोबत 2019 पासून ओळख आहे. मिश्रा याला पैशाची गरज होती, त्यामुळे त्याने स्लतःच्या आदिशक्ती प्रा. लि. या कंपनीचे लायसन्स गहाण ठेवत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करुन एक वर्षाकरीता कर्ज घेतले होते.

यानंतर आरोपीला कंपनीचे व्यवहार योग्य वाटल्याने आरोपीने यूट्युब चॅनेलसाठी 2021 मध्ये 8 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. यासाठी 5 वर्षांचे करारपत्र होते, तर 3 वर्षासाठी लॉकिंग पिरीयड होता. कराराप्रमाणे पाच वर्षात याचे 11 कोटी मिळणार होते. मात्र हे पैसे यूट्युब चॅनेल डेव्हलपिंगसाठी वापरण्याऐवजी आरोपीने दुसरीकडे वापरले. यामुळे यूट्युब चॅनेलकडून मिळणारा नफा कमी झाला. याबाबत मिश्राला चॅनेलसाठी कंटेट बनवण्यास सांगितले असता त्याने अधिक पैशाची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने त्याने सप्टेंबर 2022 मध्ये करार रद्द करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरवात केली. यानंतर जून 2023 मध्ये सेटलमेंट करुन एक कोटी आरोपीच्या बँक खात्यात टाकले.

हे सुद्धा वाचा

काल रात्री सिंग यांना एक फोन आला. त्या व्यक्तीने आपण प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसमधून बोलत असून, कार्यालया येण्यास सांगितले. मात्र पीडिताने शनिवारी येतो सांगितले. यानंतर काही वेळाच सिंग यांच्या ऑफिसमध्ये 10 ते 15 जण आले आणि सिंग यांना बळजबरीने प्रकाश सुर्वेंच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले. तेथे प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे आणि मनोज मिश्रा बसले होते. तेथून सिंग यांना एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये हलवले.

तेथे नेल्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी स्टँप पेपरवर मनोज मिश्राच्या कंपनीसोबतच करार आजपासून संपत असल्याने लिहून घेतले. याबाबत कुठेही वाच्यता केल्यास शेजारच्या खोलीतील महिलांकडे बोट दाखवत महिलेकडून खोटी केस दाखल करण्याची आणि मनी लाँड्रिंगची केस दाखल करण्याची धमकी दिली. यानंतर सिंग यांना सुर्वेंच्या ऑफिसमध्ये आणले असता तेथे पोलीस आणि त्यांचे नातेवाईक हजर होते.

सिंग हे नातेवाईक आणि पोलिसांसह पोलीस ठाण्यात गेले. या घटनेमुळे मानसिक धक्का बसलेल्या सिंग यांना नातेवाईकांनी धीर दिल्यानंतर त्यांनी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. यानंतर पोलिसांनी राज सुर्वे, मनोज मिश्रा, विकी शेट्टी यांच्यासह 10 ते 15 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.