Mumbai Fruad : महागडे मोबाईल सोशल मीडियावर स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दीड कोटींचे मोबाइल आणि लॅपटॉप जप्त

छाप्यात पोलिसांनी दीड कोटी रुपयांचे 3 हजारांहून अधिक जुने भंगार मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. आरोपी इन्स्टाग्राम आणि फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना फसवत असत.

Mumbai Fruad : महागडे मोबाईल सोशल मीडियावर स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, दीड कोटींचे मोबाइल आणि लॅपटॉप जप्त
महागडे मोबाईल सोशल मीडियावर स्वस्तात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाशImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 8:34 PM

मुंबई : नवीन फोन आणि अॅपलसारखे हाय-एंड फोन विकण्याच्या नावाखाली देशभरात स्क्रॅप केलेले जुने फोन पुरवठा करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने 2 आरोपींना अटक (Arrest) केली आहे मालाड येथील गोदामावर छापा (Raid) टाकून पोलिसांनी या टोळीचे पितळ उघडे पाडले आहे. छाप्यात पोलिसांनी दीड कोटी रुपयांचे 3 हजारांहून अधिक जुने भंगार मोबाइल आणि लॅपटॉप जप्त (Seized) केले आहेत. आरोपी इन्स्टाग्राम आणि फेक कॉल सेंटरच्या माध्यमातून ग्राहकांना फसवत असत. सध्या गुन्हे शाखा या टोळीच्या सूत्रधाराचा शोध घेत आहे. महागडे अँड्रॉईड मोबाईल स्वस्तात विकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जाहिरात देऊन या टोळ्या ग्राहकांना आमिष दाखवायचे. त्यानंतर जुने बंद मोबाईल स्वस्त दरात देत ग्राहकांची फसवणूक करायचे.

कधी बंद मोबाईल तर कधी दगड, बटाटे पाठवायचे

एखादा ग्राहक मोबाईल मिळवण्यासाठी या जाहिरात लिंकवरील फॉर्ममध्ये आपले तपशील भरत असे. त्याचवेळी त्याला मुंबईत सुरू असलेल्या कॉल सेंटरमधून फोन यायचा की, तुम्हाला हा मोबाइल तुमच्या दिलेल्या पत्त्यावर कॅश ऑन डिलिव्हरीद्वारे मिळेल. ही टोळी ग्राहकांना जुने बंद मोबाईल पॅकिंग करून स्वस्त दरात पाठवतात. तर कधी मोबाईलऐवजी बटाटे, दगड पाठवत असत. विशेष म्हणजे हे लोक मुंबईबाहेर राहणाऱ्या अशा ग्राहकांना टार्गेट करायचे. यामध्ये सर्वाधिक ग्राहक दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, त्रिपुरा आणि झारखंडमधील आहेत.

वारंवार तक्रारी आल्याने पोलिसांनी प्रकरणाचा शोध घेत छापा टाकला.

अशा फसवणुकीच्या वारंवार तक्रारी आल्यानंतर गुन्हे शाखेने तपास सुरू करून मालाड येथील एका गोदामावर छापा टाकला. गोदामातूनच बनावट कॉल सेंटर्स आणि जुने मोबाइल पॅक करून नवीन कार्टन्समध्ये पुरवले जात होते. गोदामातून पोलिसांनी दीड कोटी रुपयांचे 3 हजारांहून अधिक जुने भंगार मोबाइल आणि लॅपटॉप जप्त केले. या प्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली, जे सोशल मीडियावर 4500 मध्ये हायएड मोबाईल विकण्याचा दावा करत होते. पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला असून मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत. (A gang selling expensive mobiles cheaply on social media has been exposed)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.