Juhu Rape & Murder : जुहू परिसरातील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा

आरोपी वडिवेल उर्फ ​​गुंडप्पा चिनातांबी देवेंद्र याने 4 एप्रिल 2019 रोजी पीडित 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण विलेपार्ले पश्चिमेतील नेहरू नगर येथून अपहरण केले होते. त्यानंतर मुलावर बलात्कार करुन तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह सार्वजनिक संडासच्या ड्रेनेजमध्ये फेकला होता.

Juhu Rape & Murder : जुहू परिसरातील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा
एफआयआर दाखल केल्याशिवाय पोलीस चौकशी नाहीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 03, 2022 | 7:10 PM

मुंबई : साकीनाका बलात्कार (Rape) आणि हत्या (Murder) प्रकरणाच्या निकालानंतर आता दिंडोशी न्यायालयाने जुहू परिसरातील बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपीला फाशी (Death Sentence)ची शिक्षा दिली. वडिवेल उर्फ ​​गुंडप्पा चिनातांबी देवेंद्र असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला आज 11 व्या सत्र न्यायालयाने, दिंडोशी मुंबईने IPC च्या कलम 363, 376, 302, 201 आणि POCSO च्या कलम 4, 8, 12 अंतर्गत फाशीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना 4 एप्रिल 2019 रोजी घडली होती. पीडितेवर बलात्कार करुन तिचा मृतदेह गटारात फेकून देण्यात आला होता. या घटनेनंतर सर्वत्र संतापाची लाट उसळली होती.

मुलीचे अपहरण करुन बलात्कार केला, मग ठार मारले

आरोपी वडिवेल उर्फ ​​गुंडप्पा चिनातांबी देवेंद्र याने 4 एप्रिल 2019 रोजी पीडित 9 वर्षाच्या मुलीचे अपहरण विलेपार्ले पश्चिमेतील नेहरू नगर येथून अपहरण केले होते. त्यानंतर मुलावर बलात्कार करुन तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह सार्वजनिक संडासच्या ड्रेनेजमध्ये फेकला होता. ही घटना घडताच जुहू परिसरात लोकांनी प्रचंड आंदोलन केले होते. याप्रकरणी जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक अशोक सावंत आणि पथक यांनी तत्कालीन वपोनी पंढरीनाथ वावल यांच्या मार्गर्शनाखाली करून अटक आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले होते. यानंतर दिंडोशी सत्र न्यायालयात याबाबत खटला सुरु होता. आज दिंडोशी न्यायालयाने या खटल्यावर निकाल देत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. (Accused sentenced to death in rape and murder case in Juhu area)

हे सुद्धा वाचा

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.