मुंबई : अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी अटकेत असलेला टीव्ही अभिनेता पर्ल व्ही पुरी (Pearl V Puri) याला जामीन मिळाला आहे. वसई सत्र न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी झाली. पीडितेच्या वडिलांनी अभिनेता पर्ल पुरी विरोधात पोलिसात बलात्काराची तक्रार दिली होती. ‘नागिन’ मालिकेमुळे अभिनेता पर्ल प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला होता. (Actor Pearl V Puri gets bail in alleged Rape and Molestation case of Minor Girl)
पर्ल पुरीला 5 जून रोजी मुंबई पुलिसांनी बलात्कार प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी त्याला 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. 11 जूनला झालेल्या सुनावणीत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. मात्र मंगळवारी वसई सत्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केल्याचं वृत्त आहे.
पीडितेच्या वडिलांची तक्रार
पर्लने आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला होता. या मुलीचे वय 5 ते 7 वर्षाच्या दरम्यान आहे. पर्लवर पॉक्सो कायद्या अंतर्गत कारवाई झाल्यामुळे जामीन मिळण्यास अडचणी येत होत्या. आयपीसी कलम सीआर आयपीसी 376 एबी, आर/डब्ल्यू पोक्सो कायदा, 4, 8, 12,19, 21 अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘टीव्ही 9’ ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, हे प्रकरण 2019-20 मधील आहे. पर्ल मुंबईला लागून वसई नायगाव दरम्यान त्याच्या सीरियलसाठी शूट करत होता. ज्या अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी पर्लवर बलात्काराचा आरोप केला आहे, त्याची पत्नीदेखील या मालिकेचा एक भाग होती. ही मुलगी पर्लला त्याच्या ऑन-स्क्रीन नावाने ओळखत असे. ही तक्रार केवळ मुलीच्या वडिलांच्या वतीने दाखल करण्यात आली आहे. याबाबत आईकडून कोणतेही विधान आलेले नाही.
पर्ल पुरीला कलाकारांचं समर्थन
अनेक सेलिब्रिटी अभिनेता पर्ल पुरीच्या समर्थनार्थ उतरले होते. पीडित बालिकेच्या आई-वडिलांमध्ये वाद सुरु असल्यामुळे तिच्या वडिलांनी पर्लला नाहक या प्रकरणात गोवले, असा दावा चित्रपट निर्माती एकता कपूरने केला होता. पीडितेच्या आईनेच पर्ल निर्दोष असल्याचं सांगितल्याचा दावाही एकताने केला होता.
अभिनेता पर्ल पुरी याची नागिन मालिकेतील भूमिका गाजली होती. याशिवाय बेपनाह प्यार मालिकेतही तो झळकला होता. पर्लने काही म्युझिक व्हिडीओमध्येही काम केले आहे.
संबंधित बातम्या :
Pearl Puri | अभिनेत्याला जामीन नाहीच! पर्ल पुरीची 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी