मीरा चोप्रा फेक ओळखपत्राने लसीकरण प्रकरण, 21 श्रीमंतांना बनावट आयडीने व्हॅक्सिन दिल्याचे उघड

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून तामिळ-तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लसीकरण करुन घेतले होते (Meera Chopra fake identity card vaccinated)

मीरा चोप्रा फेक ओळखपत्राने लसीकरण प्रकरण, 21 श्रीमंतांना बनावट आयडीने व्हॅक्सिन दिल्याचे उघड
अभिनेत्री मीरा चोप्रा
Follow us
| Updated on: Jun 03, 2021 | 2:00 PM

गणेश थोरात, टीव्ही 9 मराठी, ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा (Actress Meera Chopra) हिने बनावट ओळखपत्र तयार करुन बेकायदेशीरपणे लस घेतल्याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना अहवालात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एकट्या मीरा चोप्रालाच अशा प्रकारे बेकायदेशीर लस देण्यात आली नसून 21 श्रीमंत तरुण आणि तरुणींचे बनावट ओळखपत्र तयार केले होते. त्यापैकी 15 जणांना अशा प्रकारे लस देण्यात आल्याचं समोर आलं आहे. (Actress Meera Chopra fake identity card vaccinated enquiry reveals rich kids vaccinated similarly)

मीरा चोप्राचे बनावट आयडीने लसीकरण

ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा येथील कोव्हिड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून तामिळ-तेलुगू चित्रपटातील प्रसिद्ध मॉडेल-अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लसीकरण करुन घेतल्याचं गेल्या आठवड्यात उघडकीस आलं होतं. लस घेतल्यानंतर मीरामे स्वतःच्या इन्स्टाग्राम आणि ट्विटर अकाउंटवर तशी पोस्ट टाकली होती. लसीचा तुटवडा जाणवत असल्याने 45 वर्षांवरील नागरिकांना प्राध्यानाने लस मिळावी, यासाठी अनेक ठिकाणी 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण पुढे ढकलण्यात आलं आहे. अशातच बोगस आयडीने तरुण अभिनेत्रीने गैरफायदा घेत लसीकरण केल्याने सोशल मीडियावर संतापाची लाट उमटली होती.

बोगस फ्रंटलाईन वर्कर लस प्रकरण

श्रीमंत तरुणांपैकी 19 जणांना सुपरवायझर, तर दोघा जणांना अटेंडंट म्हणून बनावट ओळखत्र दिल्याचे चौकशी समितीच्या अहवालात उघड झाले आहे. बोगस फ्रंटलाईन वर्कर लस प्रकरण चौकशी समितीच्या अहवालात फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे. लवकरच हा अहवाल पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा सादर करणार असल्याची माहिती आहे.

खासगी कंपनीकडून ओळखपत्र

ओम साई आरोग्य केअर सेंटर या खाजगी कंपनीने मीरा चोप्रा हिला सुपरवायझर भासवून लस देण्यात आल्याची बाब समोर आलेली आहे. या प्रकरणी संबंधित कंपनी आणि इतर जणांवर पालिका प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी भाजप गट नेते मनोहर डुंबरे यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन भाजप आमदार निरंजन डावखरे यांनीदेखील टीका केली आहे.

पाहा व्हिडीओ 

संबंधित बातम्या :

कोविड सेंटरमध्ये सुपरवाझर असल्याचे भासवून चक्क अभिनेत्रीचं लसीकरण, ठाण्यातील धक्कादायक प्रकार

‘तुझ्या बापाला’ ट्विट हा शिवसैनिकाचा राग होता, आक्षेपार्ह भाषेतील ट्वीटवर महापौर पेडणेकरांचं स्पष्टीकरण

(Actress Meera Chopra fake identity card vaccinated enquiry reveals rich kids vaccinated similarly)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.