Raj Kundra | अभिनेत्री गहना वशिष्ठच्या चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत, शिल्पा शेट्टीचा नवरा अश्लील चित्रपट प्रकरणात कसा सापडला?

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपटांसंदर्भात एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यात राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत आणि मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली होती.

Raj Kundra | अभिनेत्री गहना वशिष्ठच्या चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत, शिल्पा शेट्टीचा नवरा अश्लील चित्रपट प्रकरणात कसा सापडला?
शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक
Follow us
| Updated on: Jul 20, 2021 | 8:21 AM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा (Raj Kundra) याला सोमवारी रात्री मुंबईतून अटक करण्यात आली. जवळपास तीन तास चौकशी केल्यानंतर क्राईम ब्रँचने रात्री 11 वाजता त्याला बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्रा अश्लील चित्रपट तयार करण्यासाठी वित्त पुरवठा करत होता. अभिनेत्री गहना वशिष्ठला (Gehana Vasisth) अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात अटक झाल्यानंतर चौकशीचे धागेदोरे राज कुंद्रापर्यंत पोहोचले. कुंद्राला आज कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण?

गुन्हे शाखेच्या माहितीनुसार राज कुंद्राचे नातेवाईक प्रकाश बक्षी यूकेमध्ये राहतात. त्यांची यूके स्थित केनरिन (Kenrin) प्रॉडक्शन हाऊस नावाची कंपनी देखील आहे. प्रकाश बक्षी चेअरमन असलेल्या या कंपनीचे राज कुंद्रा पार्टनरही आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षरित्या कुंद्रा या कंपनीचा मालक आणि गुंतवणूकदार आहे. राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत हा केनरिन प्रॉडक्शन हाऊसचा भारतातील प्रतिनिधी होता. ही कंपनी अनेक एजंट्सना अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याचे कंत्राट आणि आर्थिक सहाय्य देत असल्याचा आरोप आहे.

गहना वशिष्ठच्या अटकेनंतर रॅकेटचा पर्दाफाश

फेब्रुवारी 2021 मध्ये मुंबई क्राईम ब्रँचने अश्लील चित्रपटांसंदर्भात एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. त्यात राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत आणि मॉडेल-अभिनेत्री गहना वशिष्ठ यांच्यासह अकरा जणांना अटक करण्यात आली होती. चौकशी दरम्यान समोर आले की आंतरराष्ट्रीय स्तरावर गहना वशिष्ठ आणि उमेश कामत याला केनरिन प्रॉडक्शन हाऊसमधून अश्लील चित्रपट बनवण्याचे काम मिळत असे. मेलद्वारे तयार केलेल्या अश्लील फिल्म केनरिन प्रॉडक्शन हाऊसला पाठवल्या जात. अश्लील चित्रपट निर्मितीचे काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे थेट यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले जायचे. सोशल मीडिया अ‍ॅप हॉटस्पॉटवर हे अश्लील चित्रपट अपलोड केले जात होते.

यापूर्वी अटक केलेला आरोपी आणि राज कुंद्राचा माजी पीए उमेश कामत याच्या चौकशीत सापडलेल्या पुराव्यांच्या आधारे राज कुंद्राला सोमवारी समन्स बजावून बोलावण्यात आले होते. चौकशीनंतर त्यालाही अटक करण्यात आली. याच प्रकरणातील तपासा दरम्यान गुन्हे शाखेला हेही समजले, की केनरिन प्रॉडक्शन हाऊस देशभरातील वेगवेगळ्या एजंट्सच्या मार्फत अश्लील सिनेमे पुरवण्याचा व्यवसाय करत आहे आणि त्यासाठी फंडिंग करत आहे.

संबंधित बातम्या

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती, प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक, कारण काय?

अश्लील फिल्म; यूकेचा सर्व्हर ते ओटीटी प्लॅटफॉर्म, राज कुंद्रा अटकेत, नेमकं प्रकरण काय?

(Actress Shilpa Shetty’s husband and businessman Raj Kundra arrested in obscene film making)

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.