Adv. Jayashree Patil : अॅड. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पू्र्ण, निकाल उद्या जाहीर करणार

राकांपा अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी जयश्री पाटील आरोपी असून मागील सुनावणी दरम्यान जयश्री पाटील यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला होता. आज त्यांच्या नियमित अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या निकाल येणार आहे.

Adv. Jayashree Patil : अॅड. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पू्र्ण, निकाल उद्या जाहीर करणार
अॅड. जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पू्र्णImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 7:23 PM

मुंबई : सिल्व्हर ओक हल्ला (Silver Oak Attack) प्रकरणातील आरोपी जयश्री पाटील (Jayashree Patil) यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली आहे. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला असून, उद्या शनिवार रोजी दुपारी 3 वाजता कोर्ट निकाल जाहीर करणार आहे. जयश्री पाटील यांना न्यायालयाचा दिलासा मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशाच्या संविधानावर तसेच न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. आज झालेल्या युक्तिवादानंतर उद्याला जयश्री पाटील यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालय निकाल देणार आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर जयश्री पाटील यांनी माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांना दिली आहे. (Adv. Jayashree Patil’s pre-arrest bail hearing is complete, results will be announced tomorrow)

सिल्वर ओकवरील हल्ला प्रकरणात जयश्री पाटील आरोपी

राकांपा अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्याप्रकरणी जयश्री पाटील आरोपी असून मागील सुनावणी दरम्यान जयश्री पाटील यांना अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला होता. आज त्यांच्या नियमित अटकपूर्व जामीन अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला असून उद्या निकाल येणार आहे. या प्रकरणातील 104 आरोपी एसटी कामगार यांच्यासह मुख्य आरोपी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना देखील मुंबई सत्र न्यायालयाने मागील सुनावणीदरम्यान जामीन मंजूर केला होता. त्यानंतर ते सर्व आरोपी जामिनावर सुटले आहेत.

एसटी कामगारांकडून प्रत्येकी 300 रुपये जमा करण्यात आले

अॅड. जयश्री पाटील यांच्या याचिकेवर आज सुनावणी दरम्यान सरकारी वकील प्रदीप घरात यांनी म्हटले की, 7 एप्रिल रोजी सदावर्ते यांच्या बिल्डिंगच्या टेरेसवर मध्यरात्री एक महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये 8 तारखेला शरद पवार यांच्या निवासस्थानी हल्ला करण्यासंदर्भातील नियोजन करण्यात आले होते. तसेच सदावर्ते यांनी अनेकदा सांगितले आहे की, मी एसटी कामगारांच्या याचिकेवरील खर्चाची कुठलीही फी घेत नाही. मात्र तपासात असे समोर आले की, एसटी कामगारांकडून प्रत्येकी 300 रुपये जमा करण्यात आले होते आणि ते पैसे जयश्री पाटील यांच्याकडे देण्यात आले होते. त्यामुळे जयश्री पाटील यांना अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्यात येऊ नये असे अॅड घरत यांनी म्हटले आहे. (Adv. Jayashree Patil’s pre-arrest bail hearing is complete, results will be announced tomorrow)

हे सुद्धा वाचा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.