Mumbai Threat : 26/11 सारख्या अतिरेकी हल्ल्याच्या धमकीचं प्रकरण! पोलीस तपासातून समोर आली मोठी माहिती

न्हे शाखेच्या एक अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या नंबर वरून धमकीचा मेसेज आला आहे, तो पाकिस्तानचा नंबर असल्याचं सांगितलं जातंय. पण ज्या आय .पी. एड्रेसचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून व्हाट्सएप मेसेज पाठविला गेला आहे, तो आय .पी. एड्रेस इतर देशाचा आहे.

Mumbai Threat : 26/11 सारख्या अतिरेकी हल्ल्याच्या धमकीचं प्रकरण! पोलीस तपासातून समोर आली मोठी माहिती
धक्कादायक..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 25, 2022 | 9:18 AM

मुंबई : ट्रॅफिक पोलीस कंट्रोल रूमला आलेल्या धमकी (Threat to Mumbai News) प्रकरणाची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली आहे. मुंबई पोलिसांचं गुन्हे शाखा (Mumbai Police crime Branch) या प्रकरणाची सखोल चौकशी करतंय. ज्या अज्ञात व्यक्तीने ट्रॅफिक कंट्रोलच्या व्हाट्सएप नंबरवर 26/11 सारख्या अतिरेकी हल्ल्याची (26/11 Terrorist Attack) धमकी दिली होती, त्याबाबत आता महत्त्वपूर्ण माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून सायबर तज्ज्ञांची मदत घेतली जातेय. गुन्हे शाखेच्या एक अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीप्रमाणे, ज्या नंबर वरून धमकीचा मेसेज आला आहे, तो पाकिस्तानचा नंबर असल्याचं सांगितलं जातंय. पण ज्या आय .पी. एड्रेसचा वापर करून इंटरनेटच्या माध्यमातून व्हाट्सएप मेसेज पाठविला गेला आहे, तो आय .पी. एड्रेस इतर देशाचा आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारणे धमकी देण्याचे प्रकार याआधीही केलेल्या एका व्यक्तीनेच हे कृत्य केलं असण्याचा संशय पोलिसांना आहे. या व्यक्तीचं नाव अनिश असं असून तो डोहामध्ये असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळतेय. त्याने याआदाही अशाच प्रकारचा गुन्हा केलाय.

फडणवीसांना रिपोर्ट..

सूत्रांच्या माहिती प्रमाणे, मुंबई पोलिसांनी याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली आहे. उफमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिरेकी हल्ला करण्याची धमकी दिलेल्या प्रकरणावर बारीक लक्ष ठेवून असून या बाबतच्या चौकशीची प्रत्येक अपडेट घेत आहेत, असंही सांगितलं जातंय. त्याचप्रमाणे व्हॉट्सऍपलाही पत्र लिहिण्यात आलं असून रियल टाईम आयपी एड्रेसची माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न पोलिसांकडून केले जात आहेत. नेमक्या कोणत्या देशातून हा मेसेज करण्यात आला, याचा उलगडा त्यातून होऊ शकेल, असा विश्वास पोलीस यंत्रणेला वाटतोय.

मोबाईन नंबरचं ट्रेसिंग

धमकीचे मेसेज पाठताना एकूण 10 मोबाइल क्रमांकही पाठवले गेले होते. त्यापैकी चार मोबाइल क्रमांक यावर्षी फेब्रुवारीपासून बंद असल्यामुळे चिंता व्यक्त केली जातेय. पोलिसांनी टेलिकॉम कंपनी कडून संबंधित नंबर बाबत माहिती मागवली असून पुढील तपासही केला जातोय. गुन्हे शाखेच्या सूत्रांनी सांगितलं की, मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश दहशतवादविरोधी पथकाच्या (ATS) मदतीने करण्यात आलेल्या तपासात नमूद केलेल्या मोबाईल नंबरपैकी पाचपैकी चार नंबर हे यूपीतील बिजनौरचे, तर एक नंबर वसईचा असल्याचं समोर आलंय. या नंबरच्या मदतीने काहीचं लोकशनही ट्रेस करत मुंबई पोलिसांनी तपासाची चक्र पुढील दिशेने वळवली आहेत.

हे सुद्धा वाचा

कोण आहे अनिश?

सूत्रांच्या माहिती प्रमाणे मुंबई क्राईम ब्रांच उत्तर प्रदेश ए टी एस सोबत संयुक्त रित्या या प्रकरणाची चौकशी करत आहे. मुंबई क्राईम ब्राचंची एक टीम यूपीला ही गेली आहे. तिथे युपी एटीएस ने 2 आणखीन लोकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी मुंबई क्राईम ब्रांच करणार आहे. या व्यतिरिक्त मुंबई क्राईम ब्रांचची एक टीम हरियाणात गेली असून तिथून चौथ्या व्यक्तीला पकडण्यात आलंय. ज्यांचे नंबर व्हॉट्सअपच्या धमकीतील मेसेजमध्ये होते, तेच हे चार लोक असल्याची माहितीही समोर आलीय. मुंबई पोलीस केंद्रीय तपास यंत्रणे सोबत ही पुढील इनवेस्टीगेशन करत असल्याची माहिती मिळतेय. या यंत्रणांच्या मदतीने डोहात बसून मेसेज पाठवण्याचा संशय व्यक्त करण्यात आलेला अनिश कोण आहे, याची सखोल चौकशी केली जातेय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.