Mumbai Crime : महिलेवर अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी तथाकथित समाजसेवकाला अटक

मुंबईतील बोरिवली वेस्ट आयसी कॉलनी येथे तथाकथित समाजसेवक मॉरिस नरोना उर्फ मॉरीश भाई हा राहतो. आरोपीने एका महिलेची 88 लाखांची फसवणूक केली. तसेच पीडितेवर बलात्कारही केला. एवढेच नाही तर पीडित हिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, तसेच पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता.

Mumbai Crime : महिलेवर अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी तथाकथित समाजसेवकाला अटक
महिलेवर अत्याचार आणि फसवणूक प्रकरणी तथाकथित समाजसेवकाला अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 23, 2022 | 3:15 PM

मुंबई : महिलेवर अत्याचार (Assault) करत आर्थिक फसवणूक (Financial Fraud) करणाऱ्या तथाकथित समाजसेवकाला एमएचबी पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे. मॉरिस नरोना उर्फ मॉरीश भाई असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मॉरिश भाईने पीडितेवर बलात्कार करत तिची 88 लाखांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. आरोपी विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो परदेशात पळून गेला होता. मात्र काल रात्री तो मुंबईत परतताच मुंबई विमानतळावर पोलिसांनी त्याला अटक केली. आरोपीने आणखी किती महिलांवर अत्याचार आणि आर्थिक फसवणूक केली आहे, याबाबत एमएचबी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुंबई विमानतळावर येताच आरोपीला बेड्या

मुंबईतील बोरिवली वेस्ट आयसी कॉलनी येथे तथाकथित समाजसेवक मॉरिस नरोना उर्फ मॉरीश भाई हा राहतो. आरोपीने एका महिलेची 88 लाखांची फसवणूक केली. तसेच पीडितेवर बलात्कारही केला. एवढेच नाही तर पीडित हिचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची, तसेच पीडितेसह तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता. याप्रकरणी महिलेने आरोपीविरोधात एमएचबी पोलिसात तक्रार दाखल केली होती. मात्र आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी परदेशात पळून गेला. काल रात्री तो परदेशातून भारतात दाखल मुंबई विमानतळावर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

कल्याणच्या मोर्चेकऱ्यांवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या अंतगर्त एका अल्पवयीन तरुणीने सात नराधमांकडून सुरु असलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. या तरूणीला न्याय मिळावा यासाठी विविध संघटनांनी एकत्र येत पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला होता. कोळसेवाडी पोलिसांनी मोर्चा काढणाऱ्या संस्था विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या मोर्चात असलेल्या बॅनर्सवर पिडीत तरुणीचे नाव ठळक अक्षरात लिहिण्यात आले होते. मात्र हा कायद्याने गुन्हा असल्याने पोलिसांनी दोन आयोजक संस्था विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Alleged social worker arrested by borivali mhb police for torturing and cheating a woman)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.