Video: अंबरनाथ पोलिसांची ‘ट्रिपल सीट’ कॅमेऱ्यात कैद! मनसे कार्यकर्त्याला ताब्यात घेत ट्रिपल सीट नेलं
खरंतर पोलिसांनी ट्रिपल सीटवर मनसेच्या अविनाश सुरसे यांनी दुचाकीवरुन ट्रिपल सीट तर आणलंच. पण यावेळी पोलिसांनी बाईकवर येताना हेल्मेटही घातलेलं नव्हतं.
अंबरनाथ : पोलिसांचं काम खरंतर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आहे. पण पोलिसांकडूनच जर कायद्याची पायमल्ली होत असेल, तर त्याची चर्चा तर होणारच! महाराष्ट्रात बुधवारी सकाळपासून मशिदींवरील भोंगे आणि मनसेची हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) यावरुन वातावरण तापलंय. त्यात पोलिसांनीही खबरादारी म्हणून अनेक मनसे कार्यकर्त्यांना (MNS Worker) नोटीसा पाठवल्यात. काहींची धरपकड करण्यात आली आहे. काहींना ताब्यात घेण्यात आलंय. अशाच अंबरनाथमधून पोलिसांनी एका मनसे कार्यकर्त्यालाही सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेतलं. ताब्यात घेतलेल्या या कार्यकर्त्याला घेऊन पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. मात्र ताब्यात घेतल्यापासून पोलीस ठाण्यात आणण्यापर्यंतचा हा प्रवाश चर्चेत आला. कारण पोलिसांनी चक्क ट्रिपस सीट (Triple Seat Ambarnath Police) या मनसे कार्यकर्त्याला पोलीस स्थानकात आणलं. याचा व्हिडीओही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे अंबरनाथ पोलिसांनीच कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप आता केला गेलाय.
मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांना अंबरनाथ पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर पोलिसांनी अविनाश यांना बाईकवर बसवलं. दोघे पोलिस अविनाश यांना ताब्यात घेण्यात आले होते. दुचाकीवरुन आलेल्या पोलिसांनी अविनाश यांनी दुचाकीवरुनच पोलीस ठाण्यात आणलं. यावेळी दोन पोलीस आणि एक मनसे कार्यकर्ता असे, एकूण तिघे जण दुचाकीवरुन बसल्याचं कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ट्रिपस सीट घेत मनसे कार्यकर्त्याला पोलिस स्थानकात आणलं.
हेल्मेटही नव्हतं!
खरंतर पोलिसांनी ट्रिपल सीटवर मनसेच्या अविनाश सुरसे यांनी दुचाकीवरुन ट्रिपल सीट तर आणलंच. पण यावेळी पोलिसांनी बाईकवर येताना हेल्मेटही घातलेलं नव्हतं. त्यामुळे नियमांना हरताळ जर पोलिसच फासत असतील, तर सर्वसामान्यांनी कुणाकडे पाहायचं, असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.
म्हणून धरपकड!
राज्यात मंगळवारपासूनच वेगवेगळ्या भागातून मनसैनिकांची धरपकड केली जातेय. मनसेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पोलीसांनी खबरदारी म्हणून अनेकांना नोटीसा पाठवल्या होत्या. तर अनेक मनसैनिक भूमिगतही झाले होते. अशातच अजूनही राज्यातील वेगवेगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड ही केली जातच असल्याचं पाहण्यात आलंय.
पाहा व्हिडीओ :
Video : अंबरनाथ पोलिसांची ‘ट्रिपल सीट’ कॅमेऱ्यात कैद #ambernath #police #trippleseat pic.twitter.com/53TAyPz8Rn
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 4, 2022