अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क एसीबीच्या जाळ्यात, दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ

अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये नेहमीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. कुठल्याही लहान मोठ्या कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या.

अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क एसीबीच्या जाळ्यात, दीड हजारांची लाच घेताना रंगेहाथ
अंबरनाथमध्ये लाच प्रकरणी दोघे अटकेत
Follow us
| Updated on: Jul 09, 2021 | 10:25 AM

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये रेशनिंग विभागाचे दोन क्लार्क अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. डुप्लिकेट रेशनकार्ड आणि ऑनलाईन नोंदणी यासाठी प्रत्येक कार्डामागे पाचशे रुपयांची लाच घेताना या दोन क्लार्कना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ बेड्या ठोकल्या. (Ambernath ACB arrested two clerk in Rationing Department red handed while receiving bribe)

नेमकं काय घडलं?

अंबरनाथ शहरातील रेशनिंग ऑफिसमध्ये नेहमीच भ्रष्टाचाराच्या तक्रारी येत असतात. कुठल्याही लहान मोठ्या कामासाठी पैसे मागितले जात असल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्या होत्या. त्यातच जावसई भागात राहणारे शिवसेनेचे शाखाप्रमुख राजू सोमा यांनी त्यांच्या भागातील दोन जणांचे फाटलेले रेशनकार्ड नव्याने तयार करण्यासाठी, तर एक रेशनकार्ड ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी दिले होते.

शिवसेना शाखाप्रमुखाची तक्रार

या प्रत्येक कार्डासाठी 500 रुपये या प्रमाणे 1 हजार 500 रुपयांची लाच मागण्यात आली होती. खिडकी क्रमांक दोनवरील क्लार्क प्रताप ब्रह्मनाद आणि खिडकी क्रमांक तीनवरील क्लार्क सुनीता हिंदळे यांनी ही लाच मागितली होती. त्यामुळे राजू सोमा यांनी याबाबत ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली.

सापळा रचून रंगेहाथ अटक

त्यानुसार गुरुवारी सापळा रचून एसीबीने या दोघांनाही लाच घेताना रंगेहाथ अटक केली. यानंतर आता तरी अंबरनाथच्या रेशनिंग ऑफिसमधल्या भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या : 

पुण्यातील शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील कर्ज प्रकरण, तीन तत्कालीन अधिकाऱ्यांना अटक

मैत्रिणीला भेटायला आला आणि अडकला, गँगस्टर सोनू पठाणला अटक, समीर वानखेडेंच्या पथकाची कारवाई

(Ambernath ACB arrested two clerk in Rationing Department red handed while receiving bribe)

'देवेंद्र' 3.0, बस नाम ही काफी है... दिल्लीत फडणवीसांच्या नावावर मोहोर
'देवेंद्र' 3.0, बस नाम ही काफी है... दिल्लीत फडणवीसांच्या नावावर मोहोर.
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले
'..तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार', भाजप तयार नाही अन् शिंदे अडून बसले.
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'
'काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, हे राज्य कोणाच्या भरवशावर?'.
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले
मोठी बातमी, ... तरच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार, एकनाथ शिंदे अडून बसले.
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.