शाहरुखच्या मुलाचा फोन जप्त, चॅटमध्ये नेमकं काय?; कारवाईत अटक करण्यात आलेल्या त्या दोन महिला कोण?

क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने आर्यनचा मोबाईलही जप्त केला असून त्याच्या मोबाईल चॅट तपासल्या जात आहेत. (Aryan Khan being questioned in Mumbai cruise drugs case, phone seized)

शाहरुखच्या मुलाचा फोन जप्त, चॅटमध्ये नेमकं काय?; कारवाईत अटक करण्यात आलेल्या त्या दोन महिला कोण?
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 12:10 PM

मुंबई: क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला एनसीबीने ताब्यात घेतलं आहे. एनसीबीने आर्यनचा मोबाईलही जप्त केला असून त्याच्या मोबाईल चॅट तपासल्या जात आहेत. या चॅटमधून अजून काही धागेदोरे मिळवण्याचा प्रयत्न एनसीबीचा असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

या रेव्ह पार्टीवर छापेमारी केल्याचं एनसीबीने अधिकृतपणे स्पष्ट केलं आहे. 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया क्रूजवर छापा मारण्यात आला. तिथल्या उपस्थित असलेल्या सर्वांचा तपास करणअयात आला. यावेळी एमडीएमए, कोकीन, एमडी आणि चरस जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी एकूण 8 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात दोन महिलांचा समावेश आहे. या महिला बॉलिवूडशी संबंधित आहे का? या महिला नेमक्या कोण आहेत? त्यांचे बॅकग्राऊंड काय आहे? याबाबतची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. एनसीबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

शाहरुखच्या मुलाची कसून चौकशी

अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानलाही अटक करण्यात आली आहे. एनसीबीने त्याची चौकशीही सुरू केली आहे. एनसीबीच्या हाती क्रूझवरील पार्टीचा व्हिडीओ सापडला असून या व्हिडीओतील अॅक्टिव्हीटी पाहून एनसीबी नेमकं अनुमान काढणार असल्याचं सांगितलं जातं.

मला पार्टीत पाहुणा म्हणून बोलावलं

आर्यन याची कसून चौकशी केली असता मला या पार्टीत केवळ पाहुणा म्हणून बोलावलं होतं. मी या पार्टीत सहभागी होण्यासाठी पैसे भरले नव्हते. ऑर्गनायजरने माझ्या नावाचा वापर करून लोकांना पार्टीत बोलावलं होतं, असा दावा आर्यनने केल्याचं सूत्रांनी सांगितलं. तसेच आर्यनचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. त्याचे व्हॉट्सअॅप चॅटही तपासले जात आहेत. रेव्ह पार्टीबाबत या चॅटमध्ये काही चर्चा झाली होती का? या रेव्ह पार्टी पूर्वीपासूनच सुरू आहेत का? आदी माहिती एनसीबी घेत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

तीन दिवस पार्टी

हे क्रूझ मुंबईवरून गोव्याला जात होते. शनिवारी दुपारी क्रूझ निघाले होते. 4 ऑक्टोबर रोजी ते मुंबईत येणार होते. तीन दिवसासाठी म्युझिकल प्रवासासाठी प्रवाशांकरता फूल पॅकेज तयार करण्यात आलं होतं. या क्रूझवर ‘Cray’Ark’ नावाने इव्हेंट ऑर्गनाइज करण्यात आले होते.

5 लाखापर्यंतची एन्ट्री फी

या पार्टीसाठी तगडी फी वसूल करण्यात आली होती. ज्या जहाजावर ही पार्टी सुरू होती, ते जहाज कॉर्डेलिया क्रूझ कंपनीचे होते. ही पार्टी फॅशन टीव्ही इंडिया आणि दिल्लीच्या Namascray Experience नावाच्या कंपनीने आयोजित केली होती. भर समुद्रात होणाऱ्या या पार्टीसाठी 60 हजारापासून ते 5 लाखापर्यंतची फी ठेवण्यात आली होती.

मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त

या क्रुझवरून एनसीबीने मोठ्या प्रमाणावर प्रचंड ड्रग्ज जप्त केलं आहे. एनसीबीने 30 ग्रॅम चरस, 20 ग्रॅम कोकीन, 25 एमडीएमए ड्रग्जच्या टॅबलेट आणि 10 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त कर्मयात आलं आहे.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : शाहरुख खानचा मुलगा एनसीबीच्या ताब्यात, क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी आर्यनवर कारवाई

मुंबईत नार्कोटिक्स ब्युरोची मोठी कारवाई; क्रुझवरील रेव्ह पार्टीवर धाड, बड्या अभिनेत्याच्या मुलाला अटक?

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात 35 वी अटक, डॅशिंग अधिकारी समीर वानखेडेंवर कौतुकाचा वर्षाव

(Aryan Khan being questioned in Mumbai cruise drugs case, phone seized)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.