मुंबईतल्या हायप्रोफाईल ड्रग्जकांडातही आता केंद्र विरुद्ध ठाकरे सरकार? मलिक म्हणतात, ‘मुंबई पोलीसांनीही चौकशी करावी’

मुंबईतल्या हायप्रोफाईल ड्रग्जकांडातही आता केंद्र विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आतापर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे होती. आता नवाब मलिक यांनी मुंबई पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी केल्याने राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार यांच्याच संघर्ष होण्याची शक्यता आहे.

मुंबईतल्या हायप्रोफाईल ड्रग्जकांडातही आता केंद्र विरुद्ध ठाकरे सरकार? मलिक म्हणतात, 'मुंबई पोलीसांनीही चौकशी करावी'
Nawab Malik
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 12:57 PM

मुंबई : मुंबईतल्या हायप्रोफाईल ड्रग्जकांडातही आता केंद्र विरुद्ध ठाकरे सरकार असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. कारण आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाची चौकशी आतापर्यंत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे होती. परंतु राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री नवाब मलिक यांनी आतापर्यंत तीन पत्रकार परिषदा घेऊन एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करुन कारवाई आणि आतापर्यंतच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुंबई पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यामुळे आता केंद्रीय तपास यंत्रणेकडे या प्रकरणाची चौकशी असताना मुंबई पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केल्याने केंद्र सरकार विरुद्ध राज्य सरकार, अशा वादाची शक्यता निर्माण झाली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानवर टाकलेली धाड ही बनावट आणि नियोजित होती. फर्जीवाडा करुन, बातम्या पुरवल्या. 1300 लोकांच्या जहाजावर 11 जणांनाच ताब्यात घेण्यात आलं. त्यापैकी तिघांना का सोडण्यात आलं असा सवाल नवाब मलिक यांनी केला. इतकंच नाही तर नवाब मलिक यांनी NCB चे डॅशिंग अधिकारी समीर वानखेडे यांचे कॉल डिटेल्स तपासण्याची मागणी केली आहे. तसंच समीर वानखेडे यांना भाजप नेत्यांनी फोन केल्यामुळे त्यांनी तिघांना सोडून दिल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. तसंच या प्रकरणाची मुंबई पोलिसांनी चौकशी करावी, असं ते म्हणाले.

नवाब मलिकांनी नेमकी काय मागणी केली?

आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे, चौकशी करा, समीर वानखेडेंची कॉल डिटेल घ्या, ज्चा तिघांना सोडण्यात आलं, वडील आणि काका हे एनसीबी ऑफिसमध्ये गेले याबाबत शंका आहे, समीर वानखेडेंसोबत भाजपच्या नेत्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर सोडण्यात आलं हे कॉल डिटेलमध्ये समोर येईल, अशी मागणी मलिक यांनी केली.

ठाकरे सरकार विरुद्ध केंद्र सरकार?

प्रसिद्ध दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात देखील मुंबई पोलिस विरुद्ध केंद्र सरकारची तपास यंत्रणा सीबीआय एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. सुरुवातीला सुशांत केसचा तपास मुंबई पोलिसांकडे होता. परंतु सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर हा तपास सीबीआयकडे गेला. नंतर सीबीआयच्या तपासावरुनही मुंबई पोलिस आणि सीबीआयमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. आता आर्यन खान ड्रग्जकेसचा तपास एनसीबीकडे असताना मलिक यांनी मुंबई पोलिसांनी चौकशी करण्याची मागणी केल्याने आता राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार संघर्ष होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक काय म्हणाले ?

युवा मोर्चाचा अध्यक्ष मोहित कुंबोज आता मोहित भारतीय म्हणून नाव आता लावतात. त्यांचे भाजपच्या बड्या नेत्यांसोबत संबंध, राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे. मोहित कुंबोज हे त्यांचे मेहुणे रिषभ सचदेवा यांना सोडवण्यासाठी NCB कार्यालयात गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे वडील, त्यांचे काकाही होते.

प्रतीक गाभा आणि आमीर फर्निचरवाला यांची नावं कोर्टात उल्लेख करण्यात आला. या दोघांच्या बोलावण्यावरुन आर्यन खान तिकडे गेले होते. १३०० लोकांच्या जहाजावर रेड टाकली, रात्री १२ तास रेड टाकण्यात आली, त्यापैकी ११ लोकांना ताब्यात घेतलं, या सर्वांना एनसीबीच्या कार्यालयात आणण्यात आलं. त्यानंतर तीन जणांना सोडण्यात आलं, ते कुणाच्या आदेशावरुन हे एनसीबीने सांगावं.

दिल्लीपासून महाराष्ट्रातील नेत्यांपर्यंत भाजपच्या नेत्यांनी फोन करुन रिषभ सचदेवा, आमीर फर्निचरवाला, प्रतिक गाभा यांना सोडण्याचे आदेश देण्यात आले. १३०० लोकांपैकी ११ लोकांना पकडण्यात आलं तर तिघांना का सोडलं हे सांगा. समीर वानखेडेंनी याचा खुलासा तात्काळ सोडावं. १३०० पैकी ११ लोकांनाच का पकडलं, ३ जणांना का सोडलं, कोणत्या माहितीवरुन का सोडलं हे सांगावं.

व्हॉट्सअॅप चॅटवरुन पुढे तपास सुरु आहे. तीन लोकांना का आणि कसं सोडलं. छापेमारीचं काम हे पूर्णपणे बनावट आहे. प्लॅन करुन छापा टाकला, प्लॅन करुन बातम्या पुरवल्या, प्लॅन करुनच लोकांना फसवण्यात आलं. ते निर्दोष आहेत की गुन्हेगार आहेत हे न्यायालयात ठरवलं जाईल. पण तिघांना का सोडलं हा आमचा सवाल आहे.

आमची मुंबई पोलिसांकडे मागणी आहे, चौकशी करा, समीर वानखेडेंची कॉल डिटेल घ्या, ज्चा तिघांना सोडण्यात आलं, वडील आणि काका हे एनसीबी ऑफिसमध्ये गेले याबाबत शंका आहे, समीर वानखेडेंसोबत भाजपच्या नेत्यांचं बोलणं झालं आणि त्यानंतर सोडण्यात आलं हे कॉल डिटेलमध्ये समोर येईल.

(Aryan Khan drug scandal Mumbai, now the Thackeray government against the Center? nawab malik Demand Mumbai police Should Inquiry)

हे ही वाचा :

NCB नं ड्रग्ज पार्टीतून तीन लोकांना सोडलं? मलिकांनी तिन नावं फोडली, भाजप कनेक्शनचा गौप्यस्फोट

राष्ट्रवादी, शिवसेना, आर्यन खानच्या पाठिशी? मलिकांनंतर आता अरविंद सावंत यांची ‘मुंबईची बात’

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.