Mumbai NCB Raid: रेव्ह पार्टीची इन्स्टावर जाहिरात, तीन दिवस कशी रंगणार होती पार्टी?; वाचा सविस्तर

बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एका ड्रग्ज पार्टीत एनसीबीच्या हाती लागला आहे. त्यामुळे या रेव्ह पार्टीची एकच चर्चा सुरू झाली असून या रेव्ह पार्टीबाबतची धक्कादायक माहिती समोर येत आहे. (Aryan Khan, son of Shah Rukh Khan detailed by NCB in drugs case)

Mumbai NCB Raid: रेव्ह पार्टीची इन्स्टावर जाहिरात, तीन दिवस कशी रंगणार होती पार्टी?; वाचा सविस्तर
Aryan Khan
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 3:46 PM

मुंबई: बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान एका ड्रग्ज पार्टीत एनसीबीच्या हाती लागला आहे. त्यामुळे या रेव्ह पार्टीची एकच चर्चा सुरू झाली असून या रेव्ह पार्टीबाबतची धक्कादायक माहिती समोर येत आहे. अथांग समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती. मात्र, त्याआधीच एनसीबीने हा बेत उधळून लावला आहे. या तीन दिवसात जहाजावर काय होणार होतं? ही रेव्ह पार्टी कशी रंगणार होती? सूत्रांनी दिलेल्या हवाल्यामार्फत घेतलेला हा आढावा.

8 जण ताब्यात

एनसीबीने मुंबईच्या समुद्रात एका जहाजात मोठी कारवाई करत ड्रग्स रॅकेट उघडकीस आणलंय. एनसीबीने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. ज्यामध्ये बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचाही समावेश आहे. एनसीबीने समुद्रातून मुंबईतुन गोव्याला जाणाऱ्या क्रोडिलिया या जहाजावर छापा टाकून ही मोठी कारवाई केलीय. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी त्यांच्या पथकाने ही मोठी कारवाई केलीय. गेल्या 12 तासापेक्षा अधिक काळापासून ताब्यात घेतलेल्या 8 जणांची चौकशी सुरू आहे. मात्र अद्याप अटकेची कारवाई करण्यात आलेली नाही. एनसीबीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या 8 जणांवर अटकेची कारवाई होण्याची शक्यता आहे.

दिल्लीच्या कंपनीकडून आयोजन

एनसीबीने ताब्यात घेतलेल्या 8 जणांची नाव जाहीर केली असून यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासहित 5 पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे. दिल्लीतल्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या माध्यमातून या पार्टीच आयोजन करण्यात आलं होतं. क्रोडिलिया कंपनीकडूनही यासंदर्भात स्पष्टीकरणं देण्यात आलं असून तपासयंत्रणेला सहकार्य करू अस म्हटलंय.

अशी रंगणार होती पार्टी:

दिवस पहिला:

मायामीमधला डीजे स्टेन कोलेवसोबत डीजे बुल्सआय, ब्राऊनकोट आणि दीपेश शर्माचा कार्यक्रम

दिवस दुसरा:

दुपारी 1 पासून ते रात्री 8 पर्यंत फॅशन टीव्हीच्या पूल पार्टीचं आयोजन. पूल पार्टीदरम्यान आयव्हरी कोस्टचा डीजे राऊलसोबत भारतीय डीजे कोहराचा कार्यक्रम. रात्री 8 नंतर फॅशन टीव्ही पाहुण्यांसाठी शँपेन ऑल-ब्लॅक पार्टीचं आयोजन. रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत स्पेस मोशन आणि इतर कलाकारांचा संगीत कार्यक्रम.

तिसरा दिवस:

तिसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता क्रूझ मुंबईत परतणार होतं.

इन्स्टावरून जाहिरात, लेन्सच्या डब्यातून ड्रग्ज आणलं

एनसीबीच्या अधिकाऱ्यांना या पार्टीविषयी माहिती मिळाली होती. त्यानुसार ते या पार्टीवर लक्ष ठेवून होते. इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या पार्टीची जाहिरात केली जात होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी या पार्टीच्या नियोजनाला अनुसरून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवले होते. त्यानुसार एनसीबीचे काही अधिकारी बुकिंग करून आधीच क्रूझमध्ये जाऊन थांबले होते. एनसीबीने 25 पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच पथक तयार करून ही कारवाई केलीय. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या पार्टीत कोकेन, चरस, हशीश, एमडी, एमडीएमए जप्त करण्यात आलंय. सूत्रांच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार आर्यनने डोळ्यावर लावण्यात येणाऱ्या लेन्सच्या डब्यातून ड्रग्ज नेलं होत अशी माहिती मिळतेय.

मी तर केवळ पाहुणा

दरम्यान रात्रीपासून आर्यन खानची एनसीबीच्या अधिकाऱ्याकडून चौकशी सुरू आहे. मात्र आर्यनने एनसीबीच्या चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, तो फक्त पाहूणा बनून जहाजावर गेला होता. पार्टीत जाण्यासाठी मला पैसे भरावे लागले नव्हते. पार्टीच्या आयोजकांनी माझ्या नावाचा वापर करत इतरांना निमंत्रित केलं ,अस आर्यनने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितल्याच कळतंय.

हायप्रोफाईल घरातील मुलं, तरुणीही जाळ्यात

आतापर्यंत ताब्यात घेण्यात आलेल्या 8 जणांमध्ये आर्यन खान याच्यासहित अन्य हायप्रोफाईल कुटुंबातील तरुण तरुणींचा समावेश आहे. ज्यामध्ये आर्यन खान, अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांचा समावेश आहे. त्यामुळे एनसीबी आता अटकेची कारवाई कधीपर्यंत करते हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

संबंधित बातम्या:

कोण आहेत समीर वानखेडे ज्यांच्या रेडमध्ये शाहरुखच्या मुलासह बडे बडे सापडलेत?

Mumbai NCB Raid: क्रूझवरील ड्रग्ज पार्टीतील आठ जण कोण?, नावं उघड, उद्योजकांच्या तीन मुलीही ताब्यात; एनसीबीकडून दोघांची कसून चौकशी सुरू

Mumbai NCB Raid: आर्यन खानचे वकील एनसीबीच्या कार्यालयात, सरकारी वकीलही पोहोचले, आता कोर्टात काय घडणार?

(Aryan Khan, son of Shah Rukh Khan detailed by NCB in drugs case)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.