न्यायालयीन कोठडी मिळाली खरी पण आर्यन खानसमोर आता पर्याय कोणते? बेल की कोठडी?
क्रूज ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींना आज रात्री एनसीबीच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : क्रूझ रेव्ह ड्रग्ज पार्टी प्रकरणात अडकलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला सुनावणीसाठी आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात आले होते. आर्यन खानसह इतर सात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यावेळी आर्यनचे वकील सतीश मानशिंदे पुन्हा एकदा त्याला जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले. तसेच अन्य काही आरोपींनीही जामिनासाठी अर्ज केले आहेत. मात्र याबाबत उद्या 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा सुनावणी होणार असून एनसीबीला तोपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे शाहरुखचा मुलगा आर्यनला जामीन मिळणार की कोठडी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Aryan Khan will be remanded in custody tonight and will be heard on bail tomorrow)
क्रूझ ड्रग्स प्रकरणात आतापर्यंत 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह 8 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सर्व आरोपींना आज रात्री एनसीबीच्या कार्यालयात ठेवण्यात येणार आहे. न्यायालयीन कोठडीत असूनही कोणाचीही चौकशी केली जाणार नाही. एनसीबीने म्हटले की, आर्यनचे नाव घेतल्यानंतर या प्रकरणात अचित कुमारला अटक झाली. अरबाज मर्जेंटनेही त्याचे नाव घेतले. या तथ्यांची चौकशी करण्यासाठी एजन्सीने वेळ मागितला आहे. एनसीबीने अचित कुमारची 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी मागितली आहे. 4 ऑक्टोबर रोजी झालेल्या सुनावणीत आर्यनला जामीन मंजूर झाला नाही, त्याऐवजी त्याला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आर्यनचे वकील सतीश मानशिंदे पुन्हा एकदा त्याला जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सतिश मानेशिंदे यांचा कोर्टात नेमका काय दावा?
आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतीश मानशिंदे यांनी युक्तिवाद केला होता. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं होतं.
कोर्टात नेमका कोणता युक्तिवाद झाला होता?
एनसीबीचे वकील : आर्यनच्या मोबईलमधून धक्कादायक फोटो मिळाले आहेत. तसेच मोबाईल चॅटमधून अनेक पुरावे मिळाले आहेत. क्रूझ पार्टीचं आंततराष्ट्रीय कनेक्शन उघड होत आहे. आर्यनसह नऊ आरोपींना 11 ऑक्टोबरपर्यंत कोठडी द्यावी.
वकील सतिश मानशिंदे : एनसीबीच्या तपासात आर्यनकडे ड्रग्ज सापडलेलं नाही. अरबाज मर्चंटकडे 6 ग्रॅम ड्रग्ज सापडलं. आर्यनचा ड्रग्ज खरेदी तसेच विक्रीमध्ये काहीही संबंध नाही त्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंध कसा? व्हॉट्सअॅप चॅटिंगमुळे ड्रग्ज पेडलर ठरवता येत नाही. व्हॅट्सअॅप चॅट पुरावे म्हणून पाहता येत नाहीत. (Aryan Khan will be remanded in custody tonight and will be heard on bail tomorrow)
इतर बातम्या
अजित पवार आणि बहिणींवर आयकराच्या दिवसभर धाडी, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया