वांद्रे वरळी सी लिंकवर वायूवेगात असलेल्या फरारीचा भीषण अपघात! पाहा व्हिडीओ

वांद्रे वरळी सी लिंकवरील पुन्हा भीषण अपघात! भरधाव फरारी सुसाट, अपघातानंतर काय अवस्था झाली बघा!

वांद्रे वरळी सी लिंकवर वायूवेगात असलेल्या फरारीचा भीषण अपघात! पाहा व्हिडीओ
भीषण अपघातImage Credit source: Twitter Video Grab
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 3:30 PM

मुंबई : मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर (Bandra Worli Sea Link Accident) अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीय. शुक्रवारी वांद्रे वरळी सी लिंकवर एक भीषण अपघात झाला. आलीशान सुपर कारमध्ये ज्या कारचा उल्लेख आवर्जून केला जातो, अशी जगप्रसिद्ध फरारी कार (Ferrari Accident in Mumbai) वांद्रे वरळी सी लिंकवरील रेलिंगला जोरदार धडकली. या अपघातानंतर फरारीचा अक्षरशः चक्काचूर झाला होता. त्यावरुन हा अपघात (Mumbai Acident News) किती भीषण असेल, याची निव्वळ कल्पना केलेली बरी!

या अपघाताचा एक व्हिडीओही समोर आला आहे. हा अपघात होऊन आज तीन दिवस होऊन गेलेत.  पण धक्कादायक बाब म्हणजे या अपघातप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार अद्यापही दाखल झालेली नाही. वरळीहून वांद्रेच्या दिशेने जाणाऱ्या लेनमध्ये हा अपघात झाल्याचं बोललं जातंय.

हे सुद्धा वाचा

शुक्रवारी म्हणजेच 22 ऑक्टोबरच्या रोजी रात्री सुसाट वेगात असलेल्या फरारीचा वांद्रे वरळी सी लिंकवर अपघात घडला. या अपघातात फरारीच्या बोनेटचा चक्काचूर झाला होता. तर एअरबॅगही उघडल्याचं दिसून आलंय. तसंच कारमधील मोठ्या प्रमाणात ऑईलही लीक झालं. वांद्रे वरळी सी लिंकवरुन जाणाऱ्या दुसऱ्या एका कारमधील व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय.

पाहा व्हिडीओ :

इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, ही कार 28 वर्षीय बिझनेसमन समृद्ध खंडेलवाल चालवत होते. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र कारचं प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. वांद्रे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्यापही याप्रकरणी कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही, असंही कळतंय. त्यामुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत.

पोलिसांनी या अपघातानंतर टीएआर अर्थात ट्रॅफिक एक्सिडंट रिपोर्ट तयार केला आहे. कार अपघातानंतर इन्शूरन्स क्लेम करण्यासाठी हा रिपोर्ट महत्त्वाचा असतो. रेस करण्याच्या इराद्याने चालकाने कार वांद्रे वरळी सी लिंकवर दामटली. पण दरम्यान, कार चालकानं नियंत्रण सुटलं आणि भरधाव वेगात असलेली कार एकदम जोरात सी लिंकवरील रेलिंवर आदळली असावी, अशी शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

या अपघातप्रकरणी अतिवेगाने वाहन चालवल्याप्रकरणी कोणताही दंड आकारण्यात आलेला नसल्याचंही इंडिया टुडेनं आपल्या वृत्तामध्ये म्हटलंय. त्यामुळे हे अपघातप्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय का, अशीही शंका काहींनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, 5 ऑक्टोबर रोजी, दसऱ्याच्या पहाटे पाच जणांचा वांद्रे वरळी सी लिंकवरील विचित्र अपघातात जीव गेला होता. यात वांद्रे वरळी सी लिंकवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचाही समावेश होते. एका भरधाव क्रेटा कार रुग्णवाहिकेसह अन्य दोन वाहनांना धडकली होती. त्यानंतर आता 20 दिवसांच्या आतच आणखी एक भीषण अपघात वांद्रे वरळी सी लिंकवर घडल्याचं पाहायला मिळालंय.

Non Stop LIVE Update
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्...
निकालापूर्वीच महायुती-मविआत हालचाली, 160 च्या वर दोघांचाही दावा अन्....
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
'कालचा बॉम्ब आधी फुटला असता तर...', उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात..
निकालाला काहीच तास, पवारांकडून दावा; म्हणाले, काळजी करू नका, राज्यात...
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.