Bhojpuri Actress Suicide : बनावट एनसीबी अधिकाऱ्यांनी खंडणीसाठी धमकावल्यानं भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या

भोजपुरी सिनेमा(Bhojpuri Actress)मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीनं आत्महत्या (Suicide) केली असून तिला काही बोगस एनसीबी अधिकारी (Fake NCB official) खंडणीसाठी धमकावत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे.

Bhojpuri Actress Suicide : बनावट एनसीबी अधिकाऱ्यांनी खंडणीसाठी धमकावल्यानं भोजपुरी अभिनेत्रीची आत्महत्या
प्रातिनिधिक छायाचित्र/आत्महत्या
Follow us
| Updated on: Dec 26, 2021 | 6:08 PM

मुंबई : भोजपुरी सिनेमा(Bhojpuri Actress)मध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीनं आत्महत्या (Suicide) केली असून तिला काही बोगस एनसीबी अधिकारी (Fake NCB official) खंडणीसाठी धमकावत असल्याची माहिती पोलीस तपासात समोर येत आहे. मात्र या घटनेनंतर शहरात बोगस एनसीबी अधिकाऱ्यांची टोळी तर सक्रिय नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

उकळत होते खंडणी जोगेश्वरी पश्चिममध्ये राहणाऱ्या एका 28 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीनं गुरुवारी आत्महत्या केल्याचं समोर आलं. मिळालेल्या माहितीप्रमाणे काही लोक स्वतःला एनसीबी अधिकारी असल्याचं सांगत कारवाईच्या नावाखाली खंडणी उकळत असल्याचं समोर आलंय. या टोळीच्या त्रासाला कंटाळून या अभिनेत्रीनं आत्महत्या केली. जोगेश्वरी पश्चिममधल्या कॅप्टन सामंत मार्गावरच्या सत्यम को-आप हाउसिंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या या तरूणीनं गळफास घेतला.

कारवाई न करण्याच्या बदल्यात खंडणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी 20 लाखांची खंडणी तिच्याकडे मागितल्याचं समोर आल्यानंतर अंबोली पोलिसांनी ह्या प्रकरणात गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटक केली. ही अभिनेत्री एका पार्टीमध्ये गेली असता काहीजण स्वतःला एनसीबी अधिकारी म्हणून कायदेशीर कारवाई न करण्याच्या बदल्यात 20 लाख रुपये खंडणी मागत होते. मात्र भीती आणि बदनामी होईल, असा विचार करून तिनं आत्महत्या केली.

दोघांना अटक या प्रकरणी अंबोली पोलिसांनी भा. दं. वि. कलम 306, 170, 420, 344, 388, 389, 506, 120(ब)अंतर्गत तोतया एनसीबी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सूरज व प्रवीण नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.’

कोंबड्याना मांजर करून कोकणाचे प्रश्न सुटणार आहेत का?; अजित पवारांनी नितेश राणेंना फटकारले

अतिवृष्टी-अवकाळीचा सामना करुनही मराठवाड्यात बदलतोय पीकांचा ट्रेंड , काय आहेत कारणे?

Salman Khan Snake Bite | सलमान खानच्या फार्म हाऊसवर डॉक्टरांची टीम दाखल, साप चावल्यानंतर दबंग अभिनेत्याच्या प्रकृतीविषयी नवे अपडेट्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.