Loan Fraud : वेणूगोपाल धूत यांची सुटका कधी? हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला !

व्हिडिओकोनचे वेणूगोपाल धूत यांनी सीबीआयच्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. धूत यांना दिलासा मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Loan Fraud :  वेणूगोपाल धूत यांची सुटका कधी? हायकोर्टाने निर्णय राखून ठेवला !
वेणूगोपाल धूतImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jan 13, 2023 | 4:13 PM

मुंबई : आयसीआयसीआय बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज घोटाळा प्रकरणातील आरोपी व्हिडिओकॉन समूहाचे सर्वेसर्वा वेणूगोपाल धूत यांची तुरुंगातून जामिनावर सुटका कधी होणार, याबाबतचा निर्णय उच्च न्यायालयाने राखून ठेवला आहे. धूत यांनी जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान धूत यांचे वकील तसेच सीबीआयच्या वतीने युक्तिवाद पूर्ण करण्यात आले. सीबीआयने केलेली अटक ही बेकायदेशीरच आहे, असा दावा करीत धूत यांनी जामीनावर लवकरात लवकर सुटका करण्याची विनंती न्यायालयाला केली. मात्र सीबीआयच्या वकिलांनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या कारवाईचे समर्थन करीत धूत यांच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. या सर्व पार्श्वभूमीवर कर्ज घोटाळा प्रकरणात कोचर दाम्पत्याप्रमाणे वेणुगोपाल धूत यांनाही जामीन मिळतो का, याकडे लक्ष लागले आहे.

व्हिडिओकोनचे वेणूगोपाल धूत यांनी सीबीआयच्या अटकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. धूत यांना दिलासा मिळणार की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

काय म्हणाले सीबीआय?

मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान धूत यांच्या याचिकेस सीबीआयतर्फे जोरदार विरोध करण्यात आला. ईडीचं प्रकरण हे केवळ मनी लाँड्रिगच आहे. आम्ही भ्रष्टाचाराचा कट आखल्याबद्दल गुन्हा दाखल केलाय, त्याबाबत अधिक तपास करत आहोत.

हे सुद्धा वाचा

धूत हे चौकशीत सहकार्य करत नसल्यानं त्यांना अटक केल्याचा सीबीआयतर्फे दावा करण्यात आला. पुढे सीबीआयतर्फे असंही दावा करण्यात आला की, अटकेपूर्वी कोचर आणि धूत उडवाउडवीची उत्तर देत होते. मात्र अटक करताच ते एकमेकांवर आरोप करू लागले.

सीबीआयने अटक करताना कायदेशीर प्रक्रिया पाडली नाही. हे आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे आणि कोर्टाने सर्व बाजू ऐकून निर्णय राखून ठेवलेला आहे. लवकरच यावर निर्णय अपेक्षित आहे, असे वेणुगोपाल धूत यांचे वकील अॅड. संदीप लढा म्हणाले.

प्रकरण काय आहे ?

व्हिडिओकॉन ग्रुपला 2012 मध्ये आयसीआयसीआय बँकेकडून 3 हजार 250 कोटी रुपयांचे कर्ज मिळाले होते. त्यानंतर या कंपनीचे प्रवर्तक वेणूगोपाल धूत यांनी न्यूपॉवर कंपनीत कथिक कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली होती.

आरोपींनी इतरांसोबत गुन्हेगारी कट रचून खासगी कंपन्यांना कर्जे मंजूर केल्याचा आरोप आहे. यातून आरोपींनी आयसीआयसीआय बँकेची फसवणूक केल्याचे सीबीआयने म्हटले आहे. या प्रकरणी सीबीआयने 2019 मध्ये एफआयआर दाखल केला होता.

न्यूपॉवर ही कंपनी दीपक कोचर यांनी स्थापन केली असून, कर्जाच्या या व्यवहारांतून कोचर दाम्पत्याला लाभ झाल्याचे सांगितले जाते. चंदा कोचर यांनी आयसीआयसीआय बँकेचे सीईओ आणि एमडी पद ऑक्टोबर 2018 मध्ये सोडले होते. चंदा कोचर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बेकायदा पद्धतीने व्हिडिओकॉन ग्रुपला कर्ज मंजूर केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....