Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Crime : चालत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना बोरीवली जीआरपीकडून अटक

तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोरिवली जीआरपी पथकाने कारवाई सुरु केली. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. तपास सुरु असताना गु्प्त माहितीच्या आधारे पोलिसांनी माहिम आणि धारावी येथून मायकेल कनक आणि शनि सिप्रे या दोघांना अटक केली.

Mumbai Crime : चालत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना बोरीवली जीआरपीकडून अटक
चालत्या लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या दोघांना बोरीवली जीआरपीकडून अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 27, 2022 | 4:35 PM

मुंबई : मुंबई लोकलमधून रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लुटणाऱ्या दोन आरोपींना मुंबईच्या बोरिवली जीआरपी (Borivali GRP)ने अटक (Arrest) केली आहे. तर त्यांचा एक साथीदार फरार (Absconding) झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मायकेल कनक आणि शनि सिप्रे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर आकाश घोडके असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी धारावीचे रहिवासी असून यापूर्वीही त्यांच्याविरुद्ध माहीम आणि धारावी येथे दरोडा आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत. एका प्रवाशाला लुटल्याप्रकरणी बोरीवली रेल्वे पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींना अटक

मीरा रोड येथील रहिवासी असलेले एक प्रवासी 22 ने रोजी रात्री एकच्या सुमारास विरार लोकलने प्रवास करीत होते. हे प्रवासी ज्या डब्यातून प्रवास करीत होते त्याच डब्यात मायकेल कनक, शनि सप्रे आणि आकाश घोडके हे तिघे आरोपी घुसले. आरोपींनी चालत्या ट्रेनमध्ये प्रवाशावर हल्ला करुन त्यांच्याजवळील 100 रुपये आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. याप्रकरणी सदर प्रवाशाने बोरिवली रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त झाल्यानंतर बोरिवली जीआरपी पथकाने कारवाई सुरु केली. पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. या सीसीटीव्ही फुटेजच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. तपास सुरु असताना गु्प्त माहितीच्या आधारे पोलिसांनी माहिम आणि धारावी येथून मायकेल कनक आणि शनि सिप्रे या दोघांना अटक केली. तर आकाश घोडके हा आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लोकल ट्रेनमध्ये होणाऱ्या या लुटमारीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावर पसरले आहे. (Borivali GRP arrests two for robbing passengers in moving local train)

हे सुद्धा वाचा

मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र
मंत्री अदिती तटकरेंच्या जिल्ह्यात 15 हजार महिला अपात्र.
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले
'हो, ते वक्तव्य बरोबर होतं, समजलं?', 'त्या' व्हिडिओवर अजितदादा संतापले.
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले
कोरटकर प्रकरणावरून विरोधक सत्ताधारी भिडले.
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी
अजितदादांच्या 'त्या' व्हिडिओवर गुलाबराव पाटलांची मिश्किल टिपणी.
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका
'तसा एक नेपाळी महाराष्ट्रात फिरतोय', परबांची राणेंवर नाव न घेता टीका.
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व
मराठी असल्याने डायमंड असोसिएशनने नाकारलं सभासदत्व.
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर
माझ्या बाळाला फक्त..., शिंदेंनी मदतीचा हात पुढे करताच आईला अश्रू अनावर.
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान
माझ्यावर कोणाचाही दबाव नाही; दिशाच्या वडिलांचं मोठं विधान.
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार
साताऱ्यातील त्या मजूर कुटुंबातील चिमुकल्याचा वैद्यकीय खर्च शिंदे करणार.
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्...
संतापजनक... कचऱ्यात 6 ते 7 अर्भकं, राज्य महिला आयोगाकडून दखल अन्....