VIDEO : अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला अमानुष मारहाण, अखेर भोंदू बाबावर गुन्हा दाखल

अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली नालासोपाऱ्यात एक भोंदू बाबाने महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. अखेर दोन दिवसांनी या प्रकरणी संबंधित भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

VIDEO : अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली महिलेला अमानुष मारहाण, अखेर भोंदू बाबावर गुन्हा दाखल
अंगातलं भूत बाहेर काढण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून महिलेला मारहाण
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 5:47 PM

नालासोपारा (पालघर) : अंगातलं भूत काढण्याच्या नावाखाली नालासोपाऱ्यात एक भोंदू बाबाने महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. अखेर दोन दिवसांनी या प्रकरणी संबंधित भोंदू बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार देऊन हा गुन्हा दाखल केला आहे. अंनिसच्या तक्रारीवरुन महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करणेबाबत आणि त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियम 2013 चे कलम 3 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाड्यातील एक व्हिडीओ क्लिप समोर आली आहे. या ठिकाणी श्री भैरवनाथ बाबा नावाचे मंदिर आहे. या मंदिराचा बाबा पुजारी याच मंदिरात आपली भोंदूगिरी चालवत आहे. हा भोंदू बाबाने कशाप्रकारे महिलेला मारहाण केली आहे ते संबंधित व्हिडीओत दिसत आहे. महिलेच्या अंगात भूत शिरलयं आणि ते काढण्यासाठी भोंदू बाबा तिला मारहाण करतोय. तिच्या अंगावर पाणी फेकतोय, तिच्या कपाळावर इबित लावतोय. हे सर्व चाळे तो भूत पळवण्याच्या नावाखाली करत आहे. ज्या महिलेला मारहाण झाली आहे ती महिला याच मंदिराच्या बाजूला एका पत्र्याच्या घरात राहते.

भोंदू बाबा गेल्या दहा-बारा वर्षांपासून भूत पळवण्याचं काम करतोय

घटनास्थळावरुन आम्ही या भोंदू बाबाला विचारलं तेव्हा त्याने त्या महिलेच्या अंगात भूत आलं असल्याची प्रतिक्रिया दिली. महिलेच्या पतीनेच तिला इथे आणल्याचे बाबाने सांगितलं. त्याचपबरोबर हे मंदिर 1988 पासून आहे. कुणालाही भूतबाधा, करणी झाली तर लोक घेऊन येतात, मी त्यांना मंतरतो आणि ते बरे होतात, असा दावाही हा बाबा करत आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील निळेमोरे गावाजवळील आदिवासी पाडतील हे श्री भैरवनाथ बाबाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराचा पुजारी हा हेमराज नागदा आहे. त्याच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 1988 साली स्थापन झालं आहे. या मंदिरात भूत पळवण्याचं काम मागील 10 ते 12 वर्षांपासून हा भोंदू बाबा करत असल्याचं तेथील नागरीकांनी सांगितलं आहे.

भोंदू बाबाकडून महिलेला अमानुष मारहाण

मुंबईला काम करणारी सोनी संजय राजभर ही काही दिवसांपासून मानसिक आजारी आहे. बुधवारी ती घरी थकलेल्या अवस्थेत आल्यावर तिच्या पतीने तिला भोंदूबाबा हेमराज नागदा याच्याकडे नेलं. त्या भोंदू बाबाने तिच्या घराच्या बाजूला राहणारा एक मुलगा जो चार महिन्यांपूर्वीच तलावात बुडून मृत झालाय त्याचा भूत तिच्या अंगात चढल्याचा जावई शोध लावला. त्यानंतर त्या बाबाने महिलेला अमानुष मारहाण सुरु केली. त्या महिलेला देखील काहीच कळलं नाही. मात्र एका सुज्ञ नागरीकाने या मारहाणीचा व्हिडीओ काढून या भोंदू बाबाचा भंडाफोड केला आहे.

आजूबाजूच्या नागरीकांना विचारल्यावर हा भोंदू बाबा भूत काढण्याच्या नावाखाली महिला, लहान मुलं पुरुष यांना मारहाण करत असल्याच सांगितलं आहे. यावर आवाज उठवल्यास जातीय रंग देवून, त्याला वेगळं वळण दिवं जात असल्याने कुणी पुढे येत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलं.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

हेही वाचा :

VIDEO : महिला आणि पुरुषात जुंपली, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ-मारहाण, बीडमधील धक्कादायक घटना

विसर्जनासाठी गेल्या, तीन सख्या बहिणी, त्यांच्या चार मैत्रिणी पाण्यात बुडाल्या, उत्साहाचं वातावरण क्षणार्धात बदललं

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.