Borivali Accident : बोरिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर जोडप्याला डंपरने चिरडले, खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा मनसेचा आरोप
सदर जोडपे मुंबईकडून मीरा रोडच्या दिशेने बाईकवरुन चालले होते. यावेळी बोरीवली पश्चिम द्रुतगती मार्गावर संजय गांधी नॅशनल पार्कजवळ मागून येणाऱ्या एका MH02ER5461 क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
मुंबई : बोरिवली पश्चिम द्रुतगती महामार्गावर डंपरखाली येऊन एका तरुण जोडप्याचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दुपारी दीडच्या सुमारास हा अपघात (Accident) झाला. पती-पत्नी पश्चिम द्रुतगती महामार्गावर दुचाकीवरून जात असताना मागून आलेल्या डंपरने त्यांना ठोकर दिली. त्यानंतर दोघेही डंपरखाली आले. या अपघातात पती आणि पत्नी दोघांचाही मृत्यू झाला आहे. मात्र पश्चिम द्रुतगती महामार्गावर खड्डे पडल्याने हा अपघात झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सध्या कस्तुरबा मार्ग पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी डंपरचालकाला पोलिसांनी अटक (Arrest) केले आहे. मयतांची अद्याप ओळख पटली नसून, पोलीस माहिती घेत आहेत.
#मागाठणे#नॅशनलपार्क ब्रिजवर बाईकस्वारांचा #खड्डे मुळे अपघातात दुर्दैवी मृत्यू. पश्चिम दृतीगती महामार्ग #Msrdc अंतर्गत आहे. खड्डे किती जीव घेणार? कामचोर #MEP आणि #msrdc अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा.@mnsadhikrut @RajThackeray @CPMumbaiPolice @CMOMaharashtra pic.twitter.com/yg8mPYmw9X
हे सुद्धा वाचा— Nayan Kadam (@Nayan7217_) August 17, 2022
महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा मनसेचा आरोप
सदर जोडपे मुंबईकडून मीरा रोडच्या दिशेने बाईकवरुन चालले होते. यावेळी बोरीवली पश्चिम द्रुतगती मार्गावर संजय गांधी नॅशनल पार्कजवळ मागून येणाऱ्या एका MH02ER5461 क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यावेळी पती पत्नी ट्रकच्या चाकाखाली आले आणि चिरडून त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कस्तुरबा पोलिसांनी दिली आहे. अपघाताप्रकरणी डंपरचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र महामार्गावरील खड्ड्यांनी या जोडप्याचा बळी घेतल्याचा आरोप मनसे सरचिटणीस नयन कदम यांनी केला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे बाईक पलटी झाली आणि मागून येणाऱ्या ट्रकखाली आल्याने पती-पत्नीचा मृत्यू झाला, असे मनसेचे म्हणणे आहे. याप्रकरणी नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्ते कस्तुरबा पोलीस ठाण्यात जाऊन खड्ड् भरणाऱ्या ठेकेदाराविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल न केल्यास पोलीस ठाण्याबाहेरच मनसे आंदोलन करणार असल्याचे कदम यांनी सांगितले. (Couple crushed by dumper on Western Expressway in Borivali)