दहिसर येथे प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक झाल्यानं खळबळ!

दहिसरमध्ये बेस्ट बसवर कुणी आणि का केली दगडफेक? जाणून घ्या सविस्तर

दहिसर येथे प्रवाशांनी भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक झाल्यानं खळबळ!
दहिसरमध्ये बेस्ट बसवर दगडफेकImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 15, 2022 | 9:28 AM

मुंबई : दहिसर (Dahisar Crime News) पूर्व इथं हायवेवर एका बेस्ट बसवर (Dahisar Best Bus) दगडफेक करण्यात आली. सोमवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये बसचं मोठं नुकसान झालं. बेस्ट बसच्या काचा दगडफेकीत फुटल्या. महत्त्वाचं म्हणजे प्रवाशांनी (Best Bus Passengers) खचाखच भरलेल्या बेस्ट बसवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचीही एकच घाबरगुंडी उडाली. या घटनेनं परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. तर बेस्ट बसमधील काही प्रवासी या दगडफेकीत जखमी झाल्याचंही कळतंय.

का करण्यात आली दगडफेक?

मुंबईतील दहिसर पूर्व येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर पायल हॉटेल आहे. या हॉटेलजवळ बेस्ट बसची एका कारला किरकोळ धडक बसली. त्यातून गाडीतील लोकांनी आपल्या साथीदारांना बोलवलं आणि भर रस्त्यात बसवर दगडफेक केली.

कुणी केली दगडफेक?

ज्या बसवर ही दगडफेक करण्यात आली, ती बस दहिसर चेक नाक्याकडे जात होती. त्यावेळी बेस्ट बस आणि कारचा किरकोळ अपघात झाला. अपघातातून झालेल्या बाचाबाचीनंतर ही दगडफेक करण्यात आली. कारमधील प्रवाशांनी आपल्या साथीदारांना बोलावून बसवर दगडफेक करण्यास सुरुवात केली होती. यात अनेक प्रवासी जखमीही झाले.

हे सुद्धा वाचा

दहिसरमध्ये झालेल्या या दगडफेकीच्या घटनेमुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. दरम्यात आता या घटनेची पोलिसांनीही गंभीर दखल घेतलीय. सध्या दगडफेकीबाबत स्थानिक  पोलिसांकडून पुढील तपास केला जातोय.

दगडफेक कऱण्यात आलेली बस 705 क्रमांकाची होती. दगडफेकीमध्ये बसचं मोठं नुकसान झालं. बसच्या खिडकीच्या काचा दगडफेकीमध्ये फुटल्या. तर बसच्या समोरील काचेचंही दगडफेकीमध्ये प्रचंड मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. या दगडफेकीदरम्यान, बेस्ट मधील प्रवासी प्रचंड धास्तावले होते.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.