दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी फहीम मचमचचा मृत्यू? विविध चर्चांना उधाण
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड फहीम मचमच याचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मचमच याचा मृत्यू पाकिस्तानच्या कराची शहरात झाला आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार कुख्यात गुंड फहीम मचमच याचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मचमच याचा मृत्यू पाकिस्तानच्या कराची शहरात झाला आहे. पण दाऊदचा राईट हॅण्ड छोटा शकील याने मचमच याचा मृत्यू कराचीत नाही तर दक्षिण आफ्रीकेत झाल्याचा दावा केला आहे. तसेच मचमच याचा मृत्यू कोरोनाने नाही तर हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचाही दावा त्याने केला आहे. फहीम मचमच याच्यावर भारतात खून आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे मुंबई क्राईम ब्रांच आणि दिल्ली पोलिसांचं स्पेशल सेल गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्या शोधात होते.
मचमच दाऊदचा खूप जवळचा सहकारी
मचमच हा बऱ्याच सालांपासून पाकिस्तानच्या कराचीत राहत होता. तो दाऊदच्या खूप जवळच्या आणि विश्वासू माणसांपैकी एक होता. डी कंपनीचा मुंबईतील वसुलीचा व्यवसाय तो हाताळत असे. भारतीय तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमचा व्यवसाय हाताळण्यासाठी फहीम मचमच अनेक वर्षांपासून कराचीत होता. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशीही त्याचा संबंध होता. मुंबई पोलीस सध्या या वृत्ताची शाहनिशा करत आहेत.
मचमच गेल्या महिन्यापर्यंत मुंबईत सक्रिय होता
विशेष म्हणजे डी कंपनीचा गँगस्टार फहीम मचमच हा गेल्या महिन्यापर्यंत मुंबईत सक्रिय होता. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घाटकोपरच्या एका व्यापाऱ्याला मचमचच्या नावाचा खंडणीचा फोन आला होता. हा कॉल 21 जूनला आले होते. संबंधित व्यापाऱ्याने पोलिसातही तक्रार दाखल केली होती. पण सर्व कॉल हे वीओआयपी (Voice Over Internet Protocol-VOIP) नंबरहून करण्यात आले होते. त्यामुळे फोन करणारा नेमका फहीम मचमच हाच होता की दुसरा कुणी त्याचा आवाज वापरुन फोन करत होता, याचाही शोध पोलीस घेत आहेत. जून नंतर असा कोणताच फोन आलेला नाही. त्यामुळे मचमच याच्या मृत्यूच्या बातमीत काही प्रमाणात तथ्य असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा :