Malad Suicide : कर्जबाजारीपणामुळे मालाडमधील व्यावसायिकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये कर्जदारांची मागितली माफी

पितळे यांना सध्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. त्यात गेली दोन वर्ष कोरोनामुळे व्यवसायात फटका बसला. यामुळे पितळे नैराश्येत गेले होते. याच नैराश्येतून पितळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

Malad Suicide : कर्जबाजारीपणामुळे मालाडमधील व्यावसायिकाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये कर्जदारांची मागितली माफी
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 6:52 PM

मुंबई : व्यवसायात कर्जबाजारीपणामुळे नैराश्येतून मालाडमधील एका व्यावसायिका(Businessman)ने इमारतीवरुन उडी घेऊन आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये घडली आहे. सौरभ पितळे(Saurabh Pitle) (37) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मालाड बांगुर नगर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पितळे यांच्या पश्चात पत्नी आणि 6 वर्षाचा मुलगा आहे. पितळे यांनी आत्महत्येपूर्वी 12 पानी सुसाईड नोट लिहिली असून या नोटमध्ये त्यांनी कर्ज न फेडू शकल्यामुळे कर्जदारांची माफी मागितली आहे. पितळे यांनी सहा ते सात लोकांकडून एकूण 25 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. (Debt-ridden businessman commits suicide by jumping off a building in Malad)

व्यवसायात नुकसान झाल्याने नैराश्येतून आत्महत्या

सौरभ पितळे हे उच्च शिक्षित असून गेल्या पाच वर्षापासून ते मोटरचे पार्ट विक्रीचा व्यवसाय करीत होते. ते मालाडमध्ये एका फ्लॅटमध्ये पत्नी व मुलासह भाड्याने राहत होते. पितळे यांना सध्या व्यवसायात मोठे नुकसान झाले होते. त्यात गेली दोन वर्ष कोरोनामुळे व्यवसायात फटका बसला. यामुळे पितळे नैराश्येत गेले होते. याच नैराश्येतून पितळे यांनी हे टोकाचे पाऊल उचलले. आत्महत्येपूर्वी पितळे यांनी सुसाईड नोटमध्ये आपण कुणा-कुणाकडून किती पैसे घेतले याचा तपशीलही दिला आहे. तसेच सर्व कर्जदारांची माफी मागितली आहे. इमारतीवरुन उडी घेतल्यानंतर काही तरी पडल्याचा आवाज आला म्हणून सुरक्षा रक्षकाने धावत जाऊन पाहिले असता पितळे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बांगुर नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

भंडाऱ्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्याची आत्महत्या

अज्ञात कारणावरुन भंडाऱ्यात बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी भंडाऱ्यातील लाखांदूर तालुक्यात घडली आहे. धीरज रमेश कसार असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. धीरज हा नेहमीप्रमाणे मंगळवारी कॉलेजला गेला होता. कॉलेजमधून घरी परत आल्यानंतर घरी कोणी नाही हे पाहून धीरजने आत्महत्या केली. धीरज हा गरीब कुटुंबातील होता. मात्र अभ्यासात खूप हुशार होता. तसेच तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत धीरजचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी लाखांदूर पोलिसात आत्महत्येची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. (Debt-ridden businessman commits suicide by jumping off a building in Malad)

इतर बातम्या

Nagpur Crime | पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्याने वृद्धास लुटले; आरोपी सीसीटीव्हीत कैद

परमबीर सिंहांनी ईडीला दिलेल्या जबाबात सनसनाटी खुलासे! अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये परब आणि देशमुखांचा हात?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.