VIDEO : फरसाण खाताय तर सावधान! कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल

कचर्‍यातून फरसाणची दहा ते बारा पाकीटे उचलून एक इसम घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान कर्वे रोड परिसरातील ही घटना आहे.

VIDEO : फरसाण खाताय तर सावधान! कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल
कचऱ्यातून फरसाण वेचणाऱ्या इसमाचा व्हिडिओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 8:19 PM

डोंबिवली (कल्याण) : कचर्‍यातून फरसाणची दहा ते बारा पाकीटे उचलून एक इसम घेऊन जात असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. डोंबिवली पश्चिमेकडील भागशाळा मैदान कर्वे रोड परिसरातील ही घटना आहे. ही पाकिटे आपण खाण्यासाठी नेत असल्याचं त्या व्यक्तीचे म्हणणे असले तरी हा व्हिडिओ पाहून फरसाण प्रेमींमध्ये मात्र धडकी भरली आहे.

नेमकं प्रकरण काय?

डोंबिवलीतील मनसे पदाधिकारी संकेत तांबे यांनी एका वृद्धाला कचऱ्यातून फरसाणचे पाकिटे वेचताना पाहिलं. त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात हा सगळा प्रकार कैद करण्याचा प्रयत्न केला. तांबे यांनी वृद्ध इसमाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र संबंधित वृद्ध काही क्षणातच पसार झाला. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वृद्ध फरसाण विक्रीसाठी घेऊन जात होता की स्वतःसाठी खायला नेत होता? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. तसेच अशापद्धतीने कचऱ्यात मुदत संपलेले खाद्यपदार्थ टाकले जात असल्याचे देखील  या व्हिडिओमुळे समोर आले आहे. याशिवाय अशाप्रकारे नागरिकांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या या व्यक्ती विरोधात कारवाई करण्याची मागणी देखील आता केली जात आहे.

व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत संभाषण नेमकं काय?

संबंधित व्हिडीओत मोबाईलच्या कॅमेऱ्यात घटना कैद करणारा तरुण फरसाणचे पॅकेट वेचणाऱ्या वृद्धाला प्रश्न विचारतो. एवढे फरसाणचे पॅकेट कुठे घेऊन चालले, काय करणार त्याचे? असा सवाल तिथले नागरिक करतात. त्यावेळी मला खाण्यासाठी हवं आहे, असं उत्तर वृद्ध देतो. पण कचऱ्यातून उचलून अर्थ नाही. तुम्ही लोकांना विकणार असाल तर पुढे काय होईल? असं व्हिडीओ शूट करणारा व्यक्ती विचारतो. त्यावर वृद्ध उत्तर देतो.

‘विकण्यासाठी घेऊन जात नाहीय’

“मी विकण्यासाठी घेऊन जात नाहीय. तर घरी खाण्यासाठी घेऊन जातोय. मी व्यापारी थोडी आहे. मी एक वयस्कर वृद्ध व्यक्ती आहे”, असं उत्तर संबंधित वृद्ध व्यक्ती देतो. पण कचऱ्याचं तुम्ही तरी का खात आहात? असा सवाल तिथे उपस्थित नागरीक करतात. त्यावर काहीही न बोलता तो वृद्ध तिथून निघून जातो. या प्रकरणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी पकडावं आणि त्याला फरसाण कुठे विकले तर नाही ना? याची शहानिशा करावी, अशी मागणी काही नागरिकांनी केली आहे.

संबंधित घटनेचा व्हिडीओ बघा :

दुकानातून फरसाण घेताना काय सावधगिरी बाळगावी?

संबंधित व्हिडीओमुळे अनेकांना धक्का बसला आहे. पण फरसाण घेताना काळजी घेतली तर आपल्या हाती अशाप्रकारचे फरसाण लागणार नाही. कधीही फरसाण घेताना त्या फरसाणची पॅकेजिंग तारीख बघावी. तसेच ते पॅकेट किती दिवसांपर्यंत चालू शकतं याची चौकशी करावी. त्याची खरी किंमत काय, पदार्थाची गुणवत्ता काय या सगळ्यांची योग्य चाचपणी करुनच फरसाण विकत घ्यावं.

हेही वाचा :

13 वर्षीय चिमुकलीची कुऱ्हाडीने हत्या, मुलीचा बाप इतका निर्घृणपणे का वागला?

VIDEO : चोर ते चोर वर शिरजोर, नागपुरात महावितरण कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला, मन हेलावणारं कृत्य, कारण फक्त….

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.