गोरेगावमध्ये एटीएममध्ये भरण्यासाठी आणलेले पैसे पळवले, रोकड भरलेल्या व्हॅनसह चालक फरार
गोरेगाव पश्चिम येथील पाटकर महाविद्यालयात युनियन बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये सोमवारी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास बँकेचे कर्मचारी पैसे भरण्यासाठी आले होते.
मुंबई : गोरेगावमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एटीएमएम (ATM) मशिनमध्ये भरणा करण्यासाठी आणलेली रक्कम (Cash) घेऊन व्हॅन चालक फरार (Absconded) झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त विनोद मिश्रा आणि डीसीपी विशाल ठाकूर घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
युनियन बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणा करण्यासाठी आले होते कर्मचारी
गोरेगाव पश्चिम येथील पाटकर महाविद्यालयात युनियन बँकेचे एटीएम आहे. या एटीएममध्ये सोमवारी दुपारी 12.30 ते 1 वाजण्याच्या सुमारास बँकेचे कर्मचारी पैसे भरण्यासाठी आले होते.
व्हॅनमध्ये 4 कोटीची रक्कम
एटीएमजवळ गाडी पोहचताच कर्मचारी खाली उतरले आणि एटीएममध्ये गेले. चालकाने हिच साधत एमएच 43 बीएक्स-5643 क्रमांकाची व्हॅन रोकड असलेल्या व्हॅनसह पोबारा केला. व्हॅनमध्ये सुमारे 4 कोटीची रोकड होती.
व्हॅनमधून काही रोकड गायब
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त आणि डीसीपी यांनी तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. तांत्रिक तपासादरम्यान काही वेळाने ही व्हॅनचा शोध पोलिसांना लागला. पिरामल नगर येथे पोलिसांना व्हॅन आढळून आली. पोलिसांनी व्हॅन ताब्यात घेत व्हॅनची तपासणी केली. यावेळी व्हॅनमधील एकूण रकमेपैकी काही रोकड गायब असल्याचे निदर्शनास आले.
पोलीस आरोपीचा शोध घेताहेत
पैसे घेऊन आरोपी व्हॅन चालक फरार झाला आहे. पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत. आरोपीने असे का केले ? त्याने कोणत्या कारणाने चोरी केली ? हे आरोपीला अटक झाल्यानंतरच स्पष्ट होईल. पोलीस आरोपी चालकाला शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत. (Driver absconded with cash brought to ATM in Goregaon)