परमबीर सिंग यांना लवकरच ईडीचे समन्स, अनिल देशमुखांवरील आरोपांवर जबाब, नेमकं काय बाहेर येणार? महाराष्ट्राचं लक्ष
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत (ED will send summons to Parambir Singh on Anil Deshmukh case).
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर कथित 100 कोटी वसुलीचे आरोप केले आहेत. या आरोपांचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरे तसेच कार्यालये अशा वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले आहेत. त्याचबरोबर देशमुख यांचे दोन सचिव ईडीच्या कोठडीत आहेत. याप्रकरणी ईडीकडून तपास सुरुच असून आता ईडी अधिकारी लवकरच परमबीर सिंग यांना चौकशीचे समन्स बजावणार आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे (ED will send summons to Parambir Singh on Anil Deshmukh case).
परमबीर सिंग यांचे देशमुखांवर नेमके आरोप काय?
परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख API सचिन वाझे याला वसुली करायला सांगत होते. देशमुख यांनी वाझेला महिन्याला 100 कोटी रुपयांच्या वसुलीच टार्गेट दिलं होतं, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. याबाबत परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्राच्या आधारावर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे. त्या जनहित याचिकेत मुंबई हायकोर्टाने चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सीबीआयला दिले होते (ED will send summons to Parambir Singh on Anil Deshmukh case).
ईडी आता जेलमध्ये जाऊन सचिन वाझेची चौकशी करणार
या प्रकरणी सीबीआयने चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. याच गुन्ह्याच्या आधारावर ईडीने आपला गुन्हा दाखल केला आहे. ईडीने अनिल देशमुख आणि इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. यानंतर ईडीने विशेष कोर्टातून API सचिन वाझे याची जेलमध्ये जाऊन चौकशी करण्याची काल परवानगी मिळवली आहे.
परमबीर सिंग यांना चौकशीसाठी बोलावणं आवश्यक
ईडीचे अधिकारी उद्या तळोजा जेलमध्ये जाऊन सचिन वाझे याची चौकशी करणार आहेत. सचिन वाझे याच्या चौकशीने तपासाची ही साखळी पूर्ण होत नाही. यातील मुख्य तक्रारदार परमबीर सिंग हे आहेत. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी बोलावणं ईडीला आवश्यक आहे. त्यामुळे सचिन वाझे याची चौकशी पूर्ण होताच परमबीर सिग यांना ईडीचे अधिकारी समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावणार असल्याचं ईडीच्या सूत्रांच म्हणणं आहे.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांचा ईडी मुक्काम वाढला, 20 जुलैपर्यंत कोठडीत वाढ
पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार