आर्यन खान, मुक्काम-आर्थर रोड जेल, बराक क्रमांक 1, दिनचर्या कशी असणार? वाचा सविस्तर

सर्व आरोपींना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येणार असून, कारागृहाचा गणवेश परिधान करावा लागणार आहे. आरोपींना बाहेरचे अन्न घेता येणार नाही. तसेच सर्वांना 5 दिवस विलगीकरणात ठेवणार असून, काही लक्षणे असल्यास कोरोना चाचणी केली जाईल.

आर्यन खान, मुक्काम-आर्थर रोड जेल, बराक क्रमांक 1, दिनचर्या कशी असणार? वाचा सविस्तर
आर्यन खान, मुक्काम-आर्थर रोड जेल, बराक क्रमांक 1
Follow us
| Updated on: Oct 08, 2021 | 6:32 PM

मुंबई : क्रूझ ड्रग्स प्रकरणी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. याचा अर्थ आर्यन खानला तुरुंगात रहावे लागणार आहे. आर्यनसह 5 जणांना कारागृहाच्या पहिल्या मजल्यावर बॅरेक क्रमांक 1 मध्ये ठेवण्यात येणार आहे. सर्व आरोपींना इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देण्यात येणार असून, कारागृहाचा गणवेश परिधान करावा लागणार आहे. आरोपींना बाहेरचे अन्न घेता येणार नाही. तसेच सर्वांना 5 दिवस विलगीकरणात ठेवणार असून, काही लक्षणे असल्यास कोरोना चाचणी केली जाईल. गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. (Five accused, including Aryan Khan, will be lodged in Arthur Road Jail)

कशी असेल आर्यन खानची दिनचर्या?

– सकाळी 6 वाजता उठणे – सकाळी 7 पर्यंत नाश्ता दिला जातो. शीरा पोहे दिले जातात. – सकाळी 11 पर्यंत दुपारचे जेवण दिले जाते. दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण दोन्हीमध्ये चपाती, भाजी, डाळ, भात इतर काहीही नाही. – दुपारच्या जेवणानंतर कैद्यांना फिरण्याची परवानगी आहे. परंतु आर्यन खान आणि इतरांच्या बाबतीत त्यांना 5 दिवसाचा अलग ठेवण्याचा कालावधी संपेपर्यंत बाहेर परवानगी दिली जाणार नाही. – आर्यन खान आणि इतरांना कॅन्टीनमधून अतिरिक्त अन्न हवे असल्यास शुल्क भरावे लागेल. पैसे मनी ऑर्डरद्वारे येऊ शकतात. – संध्याकाळचे जेवण 6 पर्यंत दिले जाते, पण अनेक कैद्यांना 8 पर्यंत जेवण आहे, ते प्लेट स्वतःकडे ठेवतात. – आर्यन खान आणि इतरांना जामीन मिळाल्यास कागदपत्र जास्तीत जास्त संध्याकाळी 5.30 ते 6.00 वाजेपर्यंत आर्थर रोड जेलमध्ये पोहचावे लागते. संध्याकाळी 6 वाजता जेलचे दरवाजे बंद होतात. – सकाळी 6 वाजता उठणे आणि संध्याकाळी 6 वाजता दरवाजे बंद करणे तुरुंग अधिकाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचे आहे.

आर्यन खानसह दोघांचा जामीन अर्ज फेटाळला

मुंबईवरुन गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीमध्ये आर्यन खानसह इतर सात जणांना अटक करण्यात आलं होतं. या प्रकरणाचा तपास सध्या एनसीबीकडून सुरु आहे. एनसीबीने आर्यन खानसह अरबाझ मर्चंट (आर्यनचा मित्र), मूनमून धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोप्रा यांना अटक केलं होतं. आज आर्यन खान तसेच त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर सात जणांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. जामीन अर्जावर तब्बल अडीच तास युक्तिवाद चालला. मात्र, अखेर कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट तसेच मूनमून धमेचा यांचा जामीन अर्ज फेटाळला. आहे. न्यायालयाच्या या निकालामुळे आता आर्यन खानला तुरुंगातच मुक्काम ठोकावा लागणार आहे.

तातडीने सत्र न्यायालयात जाणार

आर्यन खान आणि इतर दोघांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर एनसीबीला ड्रग्ज प्रकरणात अधिक चौकशी करता येणार आहे. मात्र, या निकालाविरोधात सत्र न्यायालयात जाणार असल्याचं आरोपींच्या वकिलांनी म्हटलं आहे. निकालाची प्रत मिळाल्यानंतर तातडीनं सत्र न्यायालयात जाणार असल्याचं वकिलांनी सांगितलं आहे.

दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी

आर्यन खानसह त्याच्यासोबत अटक करण्यात आलेल्या इतर साथिदारंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खानची बाजू अॅड. सतिश मानेशिंदे यांनी मांडली तर एनसीबीतर्फे एएसजी सिंग यांनी युक्तिवाद केला. हा युक्तिवाद तब्बल अडीच तास चालला. यावेळी दोन्ही बाजूच्या वकिलांमध्ये चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले. (Five accused, including Aryan Khan, will be lodged in Arthur Road Jail)

संबंधित बातम्या

‘…तर एनसीबी पुन्हा आर्यनच्या कस्टडीसाठी कोर्टात दावा करु शकते’, ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची महत्त्वपूर्ण माहिती

Aryan Khan drug case | शाहरुखला तिसऱ्यांदा धक्का, आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला, आर्थर रोड जेलमध्ये रवानगी !

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.