अनिल देशमुखांच्या पत्नी चौकशीला हजर राहिल्या नाही, पण वकिलामार्फत ईडी कार्यालयात कागदपत्रे सादर
अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख चौकशीसाठी कार्यालयात हजर राहू शकल्या नव्हत्या. मात्र, त्यांनी आता ईडीला हवे असणारे कागदपत्रे सादर केले आहेत.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने (ED) समन्स बाजवले होते. या समन्सनुसार आरती यांना 15 जुलैला ईडी कार्यालयात दाखल राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, आरती चौकशीसाठी कार्यालयात हजर राहू शकल्या नव्हत्या. मात्र, त्यांनी आता ईडीला हवे असणारे कागदपत्रे सादर केले आहेत. संबंधित कागदपत्रे शुक्रवारी (16 जुलै) ईडी कार्यालयाला देण्यात आले.
आरती देशमुख यांना ईडी अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात चौकशासाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण त्या हजर राहू शकल्या नव्हत्या. त्यांनी त्या दिवशी आपले वकील इंदरपाल सिंग यांच्या वतीने ईडी अधिकाऱ्यांना निवेदन पाठवलं होतं. ‘मी चौकशीसाठी हजर राहू शकत नाही. आपल्याला जी कागदपत्रे हवी आहेत, ती देते’, असं त्यांनी निवेदनात म्हटलं होतं. त्यावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आपण आपल्या अधिकृत प्रतिनिधीद्वारे कागदपत्रे देऊ शकता, असं सांगीतलं होतं. त्यानुसार आरती देशमुख यांनी शुक्रवारी आपले वकील इंदरपाल सिग यांच्यामार्फत आवश्यक ती कागदपत्रे ईडी कार्यलयात सादर केली.
अनिल देशमुख यांची मालमत्ता जप्त
अनिल देशमुख यांची 4 कोटी 20 लाखांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे. 100 कोटी वसुलीप्रकरणात ईडीने ही पहिली मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होणार आहे. ईडीने अनिल देशमुखांच्या नागपुरातील मालमत्तेवर टाच आणल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र देशमुखांचा वरळीमधला एक फ्लॅट आणि पनवेलमधील एका जमिनीवर जप्तीची कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
1 कोटी 54 लाख रुपयांचा वरळीतला फ्लॅट आणि 2 करोड 67 लाख रुपयांची उरणमधील धुतुम गावातील जमीन जी सलील देशमुख यांच्या कंपनीच्या नावावर होती ती जप्त करण्यात आली आहे.
देशमुख चौकशीसाठी हजर राहीले नाहीत
ईडीने देशमुख यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण देशमुख यांनी प्रकृतीचं कारण देऊन ते चौकशीला हजर राहीले नव्हते. पण ईडीने देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून समोर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुख यांची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने जप्त केलेली मालमत्ता ही नागपूरमधील असल्याची माहिती आहे. पण या मालमत्तेत नेमकं काय-काय आहे याचा खुलासा ईडीकडून करण्यात आलेला नाही. ईडीने आतापर्यंतच्या तपासातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात ईडीकडून अनिल देशमुख आणि त्यांच्या दोन्ही पुत्रांची चौकशी केली जाऊ शकते. ईडीने देशमुख यांच्या पत्नीला समन्स बजावले होते. पण देशमुखांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतल्याने अद्याप चौकशी झालेली नाही.
संबंधित बातम्या :
अनिल देशमुखांनंतर आता पत्नी आरती देशमुखांनाही ईडीचं समन्स, चौकशीला हजर राहण्याचे आदेश
सचिन वाझेने नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नव्हे, वकिलाचा दावा, दुसरंच नाव सांगितलं!
अनिल देशमुखांच्या खासगी सहाय्यकांचा ईडी मुक्काम वाढला, 20 जुलैपर्यंत कोठडीत वाढ
पालांडे डील करायचे, कुंदन कॅश स्वीकारायचा, देशमुखांच्या PA वर आरोप, ED पुन्हा समन्स पाठवणार