गोविंद ठाकूर, मुंबई, दि. 5 फेब्रुवारी 2024 | मुंबईतील शाळेतून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. ज्या लोकांवर शाळेची सुरक्षा करण्याची जबाबदारी आहे, त्यानेच हा प्रकार केला आहे. शाळेतील सुरक्षा रक्षकाने चक्क चार वर्षीय मुलीला चॉकलेट देण्याच्या बाहाण्याने बाथरूममध्ये नेले. त्यानंतर नको तो प्रकार घडला. हा प्रकार उघड झाल्यानंतर पालक चांगलेचे आक्रमक झाले आहेत. शाळेसमोर पालक जमा झाले आहेत. पालकांनी शाळेच्या व्यवस्थपनास जाब विचारला आहे. मुलींच्या सुरक्षेचा हा प्रश्न असल्यामुळे घटनास्थळी पोलीसही दाखल झाले आहेत. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच आरोपीला ताब्यात घेतले आहे.
कांदिवली प्री स्कूलमध्ये ४ वर्षीय मुलगी शिक्षण घेत आहे. या वयात काही समजत नसताना कांदिवली शाळेतील सुरक्षा रक्षकाने धक्कादायक प्रकार केला आहे. या भागातील समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४ वर्षीय मुलीचा विनयभंग त्याने केला आहे. त्याने मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर विनयभंग केला.
कांदिवली येथील अशोक नगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये शिकणारी 4 वर्षांची मुलगी नेहमीप्रमाणे तिच्या वडिलांसोबत शाळेत गेली होती, मात्र 2 फेब्रुवारी रोजी ती कुटुंबासह शाळेतून घरी परतली तेव्हा तिला वेदना होऊ लागल्या.
आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिच्यासोबत झालेल्या विनयभंगची घटना उघडकीस आली. या प्रकारानंतर पालक संतप्त झाले. इतर पालकांनाही या घटनेची माहिती मिळली. सर्वच जण शाळेबाहेर जमा झाले. सध्या शाळेच्या विरोधात पालकांनी भूमिका घेतली. प्रशासनाला मुलींच्या सुरक्षेबाबत जाब विचारला गेला.
कांदिवलीतील शाळेत मुलीच्या विनयभंगाचे प्रकर समोर आल्यानंतर पालकांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे. सध्या पालकांनी आज सकाळपासून शाळेबाहेर रास्ता रोको केला आहे.यावेळी शाळेच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आरोपीस फाशी देण्याची मागणी पालक करत आहेत. ही घटना उघडकीस आल्यानंतर समता नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी कांदिवली शाळेतील प्रकाराबाबत माहिती दिली. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर त्या सुरक्षा रक्षकाला तत्काळ अटक करण्यात आली. पोस्को अंतर्गत कलमे त्याला लावली आहे. पालकांचा आरोप आहे की, या प्रकरणामध्ये अजून काही लोकांचा सहभाग आहे. या प्रकरणात पिढीतेच्या आई वडिलांचे निवेदन घेतले पाहिजे. त्यांच्या निवेदनामध्ये या प्रकरणात अन्य जे काही लोक त्यांचीही चौकशी केली गेली पाहिजे.