Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा मोठ्याने आवाज करतो, शेजाऱ्यांच्या तक्रारींमुळे मुंबईत महिलेची आत्महत्या, एकाला अटक

मुंबई : सोसायटीकडे आपल्याविरुद्ध वारंवार तक्रार केली जाते, या त्रासाला कंटाळून एका महिलेने 10 वर्षीय मुलासह इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Frequent complaints against women by other flats […]

मुलगा मोठ्याने आवाज करतो, शेजाऱ्यांच्या तक्रारींमुळे मुंबईत महिलेची आत्महत्या, एकाला अटक
SUICIDE
Follow us
| Updated on: Jun 23, 2021 | 9:50 AM

मुंबई : सोसायटीकडे आपल्याविरुद्ध वारंवार तक्रार केली जाते, या त्रासाला कंटाळून एका महिलेने 10 वर्षीय मुलासह इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईतील साकीनाका परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी एकाला अटक केली आहे. तर इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Frequent complaints against women by other flats owner sakinaka women committed suicide with 10 year old child)

सोसायटीतील तक्रारींमुळे महिलेची आत्महत्या

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका परिसरातील ट्युलिपिया नावाची एक इमारत आहे. या इमारतीत रेश्मा ट्रेंचिल ही महिला राहत होती. रेश्मा ज्या फ्लॅटमध्ये राहत होत्या, त्या फ्लॅटच्या खालच्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबियांकडून त्यांच्याविरोधात वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. रेश्मा यांच्या घरात सतत वावरण्याचा आवाज येतो, असे काही फ्लॅटधारकांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सोसायटीमध्ये अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या.

या तक्रारीला कंटाळून रेश्मा ट्रेंचिल या महिलेने आपल्या दहा वर्षीय मुलासह इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. रेश्मा ट्रेंचिल यांची सुसाईड नोट सापडल्यानंतर हा सर्व धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या

रेश्मा यांच्या सुसाईड नोटनुसार, घरात सतत वावरण्याचा आवाज येतो, अशा तक्रारी माझ्याविरोधात सोसायटीकडे वारंवार तक्रार केली जात आहे. मला याचा प्रचंड मानसिक त्रास होत आहे. त्यांच्या या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करत आहे, असे तिने यात नमूद केले आहे.

एकाला अटक, दोघांविरोधात गुन्हा

याप्रकरणी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एकाला अटक करण्यात आली आहे. आयुब खान, शहणाज खान आणि शादाब अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तिघांची नाव आहेत. यातील शादाब खान याला साकीनाका पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान मृत रेश्मा ट्रेंचिल यांच्या पतीचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. त्यामुळे रेश्मा या त्या फ्लॅटमध्ये आपल्या 10 वर्षीय मुलासह एकट्याच राहत होत्या.

(Frequent complaints against women by other flats owner sakinaka women committed suicide with 10 year old child)

संबंधित बातम्या : 

अंबरनाथमध्ये बुलेट राजांना पोलिसांचा दणका, 61 मॉडिफाइड सायलेन्सर जप्त

कुटुंबातील पाच जणांची हत्या करण्यापूर्वी मेव्हणीवर अतिप्रसंग? नागपुरातील हत्याकांडात नवा ट्विस्ट

Sorry Mom! पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिपायाचा गळफास, सुसाईड नोट सापडली

कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती
कोरटकर थांबलेल्या हॉटेलांना नोटिस दिली; पोलिसांची कोर्टात माहिती.
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप
कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप.
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम
बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम.
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर
देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर.
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...