दरोडेखोरांच्या टोळीचा पर्दाफाश, दरोड्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक; कुरार पोलिसांची कामगिरी
मुंबईच्या कुरार परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे.
मुंबई : मुंबईच्या कुरार परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी शस्त्रांसह अटक केली आहे. कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 25 डिसेंबरच्या रात्री वाईन शॉपमध्ये चोरी झाली होती. या पार्श्वभूमीवर पोलीस चोरट्यांचा शोध घेत होते. 30 डिसेंबर रोजी पोलीस गस्तीवर असताना पोलिसांना मालाड पूर्वच्या शिवाजी नगर रोडवर फीरत असलेल्या पाच जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. पोलीस जवळ येताच त्यातील चार जण फरार झाले, तर एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली
ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची चौकशी केली असता त्याने दरोडा टाकण्यासाठी आल्याची कबुली पोलिसांना दिली. दरोडा टाकण्यापूर्वीच पोलिसांनी दोन आरोपींना अटक केल्याने पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे. दरम्यान या टोळीमध्ये अन्य किती जण आहेत? ते कुठे दरोडा टाकणार होते? आतापर्यंत त्यांनी किती ठिकाणी चोरी केली आहे, याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
वाईन शॉप चोरीमध्ये सहभाग?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 25 डिसेंबरच्या रात्री एका वाईन शॉपमध्ये चोरी झाली होती. ही चोरी देखील याच चोरट्यांनी केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून समोर येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पहिल्या आरोपीचे नाव हारून जैदुल सरदार असे आहे. त्याच्यावर चोरीचे 43 गुन्हे दाखल आहेत. तर राज जियालाल दिवाकर वय 24 असे या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीचे नाव आहे.
संबंधित बातम्या
Jalgaon| चटका लावणारी घटना, जळगावमध्ये अकरावीच्या विद्यार्थ्याच्या गिरणेच्या डोहात बुडून मृत्यू
‘मी जगण्याचा खूप प्रयत्न केला, पण काय करू प्राँब्लेम संपतच नाहीत म्हणत’ तरुणानं उचललं हे पाऊल…..